-

ऑफिसमध्ये काम करताना, प्रोफेशनल दिसणे महत्त्वाचे आहे पण त्याबरोबरच स्टायलिश दिसणेही महत्वाचे असते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि सर्वांवर चांगला प्रभाव निर्माण होतो. ऑफिस लूकसाठी नेल आर्टमध्ये शेड्स, सिंपल डिजाइन्स और मिनिमलिस्टिक पॅटर्न वापरणे चांगले जेणेकरून ते प्रोफेशनल एटिकेट्सशी सुसंगत असेल. (छायाचित्र स्रोत: Pinterest)
-
जर तुम्हाला तुमच्या नखांवर काहीतरी छान करायचे असेल, तर येथे काही स्टायलिश आणि सोप्या नेल आर्ट डिझाईन्स आहेत ज्या तुम्ही ऑफिस लूकमध्ये वापरून पाहू शकता:
(छायाचित्र स्रोत: Pinterest) -
मोनोक्रोम नेल्स
एकाच रंगाचे मोनोक्रोम नेल्स ऑफिससाठी योग्य आहेत. तुम्ही यामध्ये हलका गुलाबी, न्यूड, बेज किंवा क्रीम रंग वापरू शकता. हा लूक प्रोफेशनल आणि उत्कृष्ट दिसतो. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
मिनिमलिस्टिक जियोमेट्रिक पॅटर्न
साधे आणि लहान जियोमेट्रिक नेल्स देखील छान दिसतात. उदाहरणार्थ, हलकी रेषा किंवा त्रिकोण आणि ठिपके यांसारखे काही लहान आकार. हा लूक केवळ स्टायलिश नाही तर ऑफिससाठी अगदी योग्य आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
फ्रेंच टिप्स
फ्रेंच पॅटर्न नेल्स नेहमीच उत्कृष्ट आणि प्रोफेशनल आहेत. तुम्ही हलक्या पेस्टल शेड्ससह त्यांना कस्टमाइझ करू शकता. हा लूक ऑफिस वेअरवर एक उत्तम पर्याय आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
नॅचरल नेल्स पॅटर्न
जर तुम्हाला जास्त काही नको असेल, तर तुम्ही तुमचे नखे जसे आहेत तसेच आणखी सुंदर करू शकता. नैसर्गिक लूकसाठी, बेज, गुलाबी किंवा क्रीम कलरसारखे हलके शेड्स वापरा, जे तुमचे हात आणखी सुंदर बनवतील. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
मॅटलिक अॅक्सेंट
तुम्ही हलक्या गुलाबी किंवा न्यूड रंगांनी मॅटलिक छटा रंगवून तुमच्या नखांना आकर्षकता देऊ शकता. जसे की सोनेरी किंवा चांदीच्या रेषा किंवा ठिपके, जे प्रोफेशनलही दिसतात आणि तुमच्या लूकमध्ये थोडा ग्लॅमर देखील जोडतात. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
ओम्ब्रे नेल्स
ओम्ब्रे नेल्समध्ये हलक्या किंवा गडद रंगांची छटा दाखवली जाते. यामुळे एक सिंपल पण तितकाच प्रभावी लूक तयार होतो, जो ऑफिससाठी एक परिपूर्ण पर्याय आहे. तुम्ही हलक्या गुलाबी किंवा गडद गुलाबी किंवा तपकिरी रंगांचा वापर करू शकता. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
ब्लॅक अँन्ड व्हाईट मिनिमलिस्ट डिझाइन
काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण एक उत्कृष्ट आणि प्रोफेशनल लूक देते. तुम्ही एकच स्ट्राइक देऊ शकता किंवा लहान रेषा काढू शकता ज्यामुळे तुमचे हात छान दिसतील. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
न्यूड बेस आणि फुलांची डिझाइन
न्यूड बेसवर लहान फुलांचे डिझाईन्स किंवा ठिपके देखील चांगले दिसतात. हा एक अतिशय छान सूक्ष्म लूक आहे, जो ऑफिससाठी परफेक्ट आहे. (छायाचित्र स्रोत: Pinterest) -
डॉटेड अॅक्सेंट
आणखी एक सोपा आणि स्टायलिश पर्याय म्हणजे तुमचे नेल्स लहान ठिपक्यांनी सजवणे. हे खूप आकर्षक दिसते आणि ऑफिसच्या वातावरणात खूप छान दिसते. (छायाचित्र स्रोत: Pinterest) हेही पाहा- बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे तुम्हालाही कूल दिसायचे आहे? त्यांच्यासारख्या ‘या’ शॉर्ट हेअर स्टाईल करा…
ऑफिसच्या स्टायलिश आणि प्रोफेशनल लूकसाठी परफेक्ट नेल आर्ट डिझाईन्स, एकदा नक्की ट्राय करा….
नेल आर्ट फक्त पार्टी किंवा लग्नांपुरते मर्यादित नाही. तुम्ही ऑफिसमध्येही स्टायलिश दिसू शकता आणि तुमचा लूक प्रोफेशनल ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवा – डिझाइन साधे असावे, रंग न्यूट्रल असावेत आणि लूक नीटनेटका असावा.
Web Title: Classy nail looks that keep it professional spl