• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. temple bell ringing scientific and spiritual benefits svk

मंदिरात घंटा का वाजवतात? जाणून घ्या त्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण

मंदिरातील घंटा: मंदिरांमध्ये घंटा वाजवण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर तिचा खोलवर वैज्ञानिक आणि मानसिक परिणाम देखील आहे.

June 24, 2025 11:59 IST
Follow Us
  • Mystery Behind Temple Bells Science and Spirituality Combined
    1/11

    मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवली जाते. या पूर्वापार परंपरेचे भक्तीपूर्वक पालन केले जात असल्याचे आपण नेहमी पाहतो. पण, या परंपरेत केवळ भक्तीचाच भाग नाही, तर त्यामागे एक अर्थ दडलेला आहे. मंदिरात पाऊल ठेवतानाच घंटा वाजवून वातावरण पवित्र केलं जातं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/11

    पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की, मंदिरात घंटा वाजवल्याने अनेक जन्मांची पापं दूर होतात. हे एक पवित्र कर्म मानलं जातं. घंटेचा नाद हा स्वतःमध्येच एक भक्तिपूर्ण ऊर्जा निर्माण करतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/11

    वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर घंटा वाजवल्याने एक विशिष्ट ध्वनी प्रकार निर्माण होतो, जो आपल्या मनातील विचार एकाग्र करतो. असं मानलं जातं की, विश्वाच्या सुरुवातीला जो आवाज झाला, तोच नाद घंटेच्या आवाजात असतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 4/11

    घंटेचा नाद ‘ॐ’च्या उच्चारासारखा असतो, जो मनाची शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जागवतो. असं मानलं जातं की, या नादामुळे देवांच्या मूर्तींमध्ये चैतन्य निर्माण होतं आणि पूजा अधिक प्रभावी ठरते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 5/11

    घंटा वाजवल्यावर मंदिरात एक विशेष ऊर्जा निर्माण होते. त्या नादामुळे मंदिरातली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि पवित्रता निर्माण होते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/11

    घंटेचा नाद भक्ताचे मन शांत करतो. त्याचा विचारांवर परिणाम होतो, मन केंद्रित राहतं आणि देवाची उपस्थिती जाणवते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/11

    घंटेचा नाद आपल्या शरीरातील सात चक्रांवर परिणाम करतो. विशेषतः डोक्यावरील सहस्रार चक्र जागृत होऊन, आध्यात्मिक शक्ती वाढते.(छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 8/11

    घंटा वाजवली की, तिचा नाद हवेमध्ये पसरतो. त्यामधून बाहेर पडणारे ध्वनी खूप वेगाने (सुमारे ३३० मीटर/सेकंद) फिरतात आणि त्यामुळे आजूबाजूचे सूक्ष्म जंतू व विषाणू नष्ट करतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/11

    घंटेच्या ध्वनीमुळे मंदिरातील हवा अधिक शुद्ध व सकारात्मक होते. त्यामुळे भक्तांना एक शांत, पवित्र आणि सकारात्मक अनुभव मिळतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 10/11

    जेव्हा आपण मोठ्या घंटेखाली उभं राहून ती वाजवतो, तेव्हा तिचा नाद आपल्या शरीरातून जमिनीत उतरतो. त्यामुळे तणाव, चिंता व नकारात्मकता दूर होते आणि आपल्यात शांत, शुद्ध मनाने देवासमोर उभे राहण्याची क्षमता येते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 11/11

    आरती किंवा पूजा करताना घंटा वाजवणं ही एक पवित्र प्रक्रिया आहे. त्यामुळे भक्तीचा अनुभव अधिक खोल होतो. वातावरणात चैतन्य निर्माण होतं आणि मन एकाग्र राहतं. म्हणूनच म्हणतात घंटा नसली, तर पूजा अपूर्णच राहते.(छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Temple bell ringing scientific and spiritual benefits svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.