-
जगात सर्वात तीक्ष्ण नजर असलेले प्राणी
जगात कुठल्या प्राण्याची अथवा पक्ष्याची दृष्टी सर्वात तीक्ष्ण आहे असा प्रश्न विचारला तर पटकन कोणीही उत्तर देऊ शकणार नाही. कारण वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे डोळे त्यांच्या-त्यांच्या गरजांनुसार विकसित झाले आहेत. काहींना दूरवरील वस्तू खूप चांगल्या प्रकारे पाहतात येतात. तर काही जवळच्या गोष्टी स्पष्ट पाहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्राण्याची दृष्टी तीक्ष्ण असते. (फोटो – फ्रीपिक) -
सर्वात तीक्ष्ण दृष्टी : ससाणा व गरुडासारख्या पक्ष्यांची दृष्टी खूप तीक्ष्ण असते. हे पक्षी खूप उंच आकाशात उडत असताना जमिनीवरील व लपून बसलेले भक्ष्य सहजपणे ओळखू शकतात. त्यांचे डोळे मानवापेक्षा तीन ते पाच पट अधिक अचूकपणे गोष्टी पाहू शकतात. ज्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला दुर्बिणीची आवश्यकता भासते, त्या गोष्टी हे शिकारी पक्षी डोळ्यांनी सहज पाहू शकतात. (फोटो- फ्रीपिक)
-
त्यांच्या डोळ्यांमध्ये दोन खास वैशिष्ट्ये आहेत: १. त्यांचे डोळे त्यांच्या शरीराच्या प्रमाणात खूप मोठे असतात. २. त्यांच्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये फोटोरिसेप्टर्स (विशिष्ट पेशी) खूप जास्त प्रमाणात असतात. (फोटो- फ्रीपिक)
-
Mantis Shrimp (मॉन्टिस कोळंबी) : रंग पाहणे व ओळखण्याच्या क्षमतेबद्दल बोलायचं झाल्यास मॉन्टिस कोळंबी सर्वात आघाडीवर आहे. समुद्रातील जीवांचे डोळे आपल्या डोळ्यांपेक्षा अधिक तीक्ष्ण असतात. मानवी डोळ्यांमध्ये केवळ तीन प्रकारचे फोटोरिसेप्टर्स (लाल, हिरवा, निळा) असतात. मात्र, मॉन्टिस कोळंबीच्या डोळ्यांत १२ प्रकारचे फोटोरिसेप्टर्स असतात. (फोटो- फ्रीपिक)
-
मॉन्टिस कोळंबी अतिनील प्रकाशही पाहू शकते. संशोधकांनी आतापर्यंत अनेक वर्षे मॉन्टिस कोळंबीच्या डोळ्यांवर संशोधन केलंय. या कोळंबीचे डोळे इतक्या माहितीवर प्रक्रिया कसे करतात हे संशोधकांना अद्याप समजलेलं नाही. (फोटो- फ्रीपिक)
-
कीटक : मानवी डोळे एका सेकंदात ६० फ्रेम्स पाहू शकतात. परंतु, माश्या, डास व इतर काही कीटक प्रति सेकंद शेकडो फ्रेम्स पाहू शकतात. त्यामुळेच आपण माशी मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली छोटी हालचाल व्हायच्या आधीच ती उडून जाते. (फोटो- फ्रीपिक)
-
कीटकांचे शरीर खूप लहान असते आणि डोळ्यापासून मेंदूपर्यंत सिग्नल खूप वेगाने जातात. त्यामुळे त्यांची दृष्टी खूप तीक्ष्ण असते. (फोटो- फ्रीपिक)
-
प्रत्येक प्राण्याची दृष्टी त्यांच्यासाठी उत्तम असते. जसे की मॉन्टिस कोळंबी व कीटकांचे डोळे अधिक तीक्ष्ण असले तरी त्यांना सर्व गोष्टी पिक्सेलेटेड दिसतात. त्या तुलनेत मनवाची दृष्टी अधिक संतुलित आहे. मानवी डोळे गरुडाइतके तीक्षण नाहीत, मॉन्टिंस कोळंभीइतके रंगाचे शेड्स मानव पाहू शकत नाही. खूप प्रकाश सहन करू शकत नाही. मात्र, खूप चांगली व व्यवहारिक दृष्टी मानवाकडे आहे. (फोटो- फ्रीपिक)
जगात सर्वात तीक्ष्ण दृष्टी असलेला प्राणी कोणता?
वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे डोळे त्यांच्या-त्यांच्या गरजांनुसार विकसित झाले आहेत.
Web Title: Animal in the world has sharpest eyesight ieghd import asc