-
हल्ली शहरातील प्रत्येक चौकात एक तरी उसाचा रस विकणारा विक्रेता पाहायला मिळतो. उष्णता कमी करण्यासाठी आणि तहान भागविण्यासाठी लोक उसाचा रस आवर्जून पितात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
उसाच्या रसात लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, खनिजे, मॅग्निशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)
-
हा रस काही लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. कारण- त्यांनी हा रस प्यायल्यास त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.(फोटो सौजन्य: Freepik) -
जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही त्या काळात उसाचा रस पिऊ नये. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अन्न विषबाधा झाली असेल, तर तुम्ही उसाचा रस पिणे टाळावे. कारण- त्यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik) -
कोणत्याही गर्भवती महिलेने डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उसाचा रस पिणे योग्य ठरणार नाही. कारण- या काळात लवकर गेस्टेशनल डायबेटीस होण्याचा धोका निर्माण होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डोके दुखत असताना उसाचा रस पिणे टाळावे. कारण- बहुतांश प्रमाणात उसाच्या रसात बर्फ वापरला जातो. डोके दुखत असताना उसाचा रस प्यायल्याने तुमची डोकेदुखी आणखी वाढण्याचा धोका संभवतो. मग अशा वेळी तुम्हाला उसाचा रस प्यायचा असेल, तर तो बर्फविरहीत स्वरूपात पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्ही उसाचा रस न पिणे योग्य ठरेल. कारण- त्यामुळे शरीरात उष्मांकांचे प्रमाण वाढू शकते. आणि उष्मांकांचे प्रमाण वाढल्यास वजन वाढण्याचा धोका असतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
उसाचा रस ‘या’ समस्यांनी असणाऱ्यांनी कधीही पिऊ नका
Drink Sugarcane Juice: हा रस काही लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. कारण- त्यांनी हा रस प्यायल्यास त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
Web Title: People with these problems should never drink sugarcane juice sap