• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. effective monsoon skincare tips for fresh healthy and glowing skin svk

पावसाळ्यात त्वचा निरोगी कशी ठेवावी; जाणून घ्या ‘हे’ सहा सोपे उपाय

पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्वचेसमोरील समस्याही वाढतात. मुरुमं, बुरशीजन्य संसर्ग, कोरडी किंवा तेलकट त्वचा अशा त्रासांपासून दूर राहण्यासाठी योग्य स्किनकेअर आवश्यक आहे. ह्या लेखात आपण ते जाणून घेणार आहोत…

June 28, 2025 17:20 IST
Follow Us
  • girl enjoying raining
    1/7

    त्वचेची काळजी ही रोजची सवय ठेवा
    पावसाळा आला की त्वचेसाठी थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. पण, ह्या छोट्या टिप्स तुम्हाला सुंदर, स्वच्छ आणि निरोगी त्वचा मिळवायला नक्की मदत करतील.

  • 2/7

    स्वच्छ त्वचेसाठी रोजचे क्लिन्झिंग
    पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्वचेवर बॅक्टेरिया आणि बुरशी वाढतात, त्यामुळे चेहरा दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने धुणे आवश्यक आहे. तेलकट त्वचेसाठी ऑइल-कंट्रोल फेसवॉश वापरा आणि लक्षात ठेवा, मेकअप काढल्याशिवाय झोपू नका!

  • 3/7

    मॉइश्चरायझर लावायला विसरू नका
    ओलसर हवामान असले तरी त्वचेला मॉइश्चरायझरची गरज असते. जेल-बेस्ड किंवा नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा. तेलकट त्वचेसाठी ऑइल-फ्री पर्याय उत्तम ठरतो.

  • 4/7

    ढगाळ हवामानातही सनस्क्रीन आवश्यक
    पावसाळ्यातही सूर्याच्या किरणांपासून त्वचेला धोका असतो. घरात असाल तरी SPF 30 असलेले सनस्क्रीन लावा. बाहेर जात असाल तर वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरणे फायदेशीर ठरेल.

  • 5/7

    स्क्रबने एक्सफोलिएट करा
    मृत त्वचा हटवण्यासाठी आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरा. घरच्या घरी बनवलेले दही-बेसन किंवा ओट्स-मधाचे स्क्रब नैसर्गिक आणि त्वचेसाठी सुरक्षित आहेत. जास्त स्क्रब केल्याने त्वचा नाजूक होऊ शकते.

  • 6/7

    त्वचेसाठी पोषक आहार घ्या
    निरोगी त्वचेसाठी ताज्या फळभाज्या, अँटिऑक्सिडंट्स आणि भरपूर पाणी आवश्यक आहे. झणझणीत, तेलकट पदार्थ टाळा. आतून आरोग्य चांगले असेल तर त्वचा आपोआपच चमकेल.

  • 7/7

    बुरशीजन्य संसर्गापासून बचाव करा
    पावसाळ्यात शरीर ओलसर राहिल्यास बुरशीचा त्रास होऊ शकतो. अंघोळीनंतर त्वचा नीट कोरडी करा, विशेषतः पायाची बोटं, अंडरआर्म्स आणि घड्या. हलके, सैल आणि कॉटनचे कपडे घाला. गरज असल्यास अँटी-फंगल पावडर वापरा.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Effective monsoon skincare tips for fresh healthy and glowing skin svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.