• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. matcha tea benefits and reasons behind its growing consumption svk

माचा चहा : आरोग्यप्रेमींची पहिली पसंती; रहस्यासह जाणून घ्या त्याचे थक्क करणारे फायदे

सध्या आरोग्यप्रेमींच्या यादीत माचा टी हे सुपर ड्रिंक म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. ग्रीन टीसारखी दिसणारी ही पावडरयुक्त चहा अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी भरलेली आहे.

Updated: June 30, 2025 13:58 IST
Follow Us
  • matcha tea
    1/10

    सुपरड्रिंक माचा टी : जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
    आज आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये माचा टी ही एक खास पसंती ठरते आहे. ग्रीन टीसारखी दिसणारी ही माचा टी केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे. शरीराला ऊर्जावान ठेवण्यापासून ते डिटॉक्स करण्यापर्यंत, माचा टीचे अनेक जबरदस्त फायदे आहेत. काय आहे ही माचा टी आणि ती इतकी खास का आहे, हे जाणून घ्या..

  • 2/10

    माचा टी म्हणजे काय?
    माचा टी हा ग्रीन टीचाच एक खास प्रकार आहे, जो कॅमेलिया सायनेन्सिस या वनस्पतीपासून तयार होतो; पण याची पद्धत थोडी वेगळी असते. माचा झाडं सावलीत वाढवली जातात. त्यामुळे त्याचा हिरवागार रंग, चव व पोषक घटक अधिक वाढतात. सावलीमुळे त्यात क्लोरोफिलचं प्रमाणही जास्त असतं, ज्यामुळे तो नेहमीच्या ग्रीन टीपेक्षा जास्त उजळ दिसतो.

  • 3/10

    माचा टी ग्रीन टीपेक्षा वेगळी कशी?
    माचाची पाने वाफवून, वाळवून आणि नंतर अगदी बारीक पावडर बनवली जाते. ही पावडर थेट पाण्यात मिसळून प्यायली जाते, त्यामुळे सगळी पोषण मूल्यं शरीरात जातात. ग्रीन टी मात्र पानं उकळून फक्त त्याचा अर्क प्यावा लागतो. माचामध्ये एल-थियानाइन नावाचं अमिनो आम्ल जास्त प्रमाणात असतं, ज्यामुळे त्याला खास ‘उमामी’ चव येते. त्यामुळे पाच पारंपरिक चवींव्यतिरिक्त एक वेगळीच अनुभूती देते.

  • 4/10

    अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर स्रोत
    माचा टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स दूर करतात आणि पेशींवर होणारे नुकसान कमी करतात. त्यामुळे त्वचा, मेंदू आणि संपूर्ण आरोग्य टिकवण्यासाठी माचा टी उपयोगी ठरते.

  • 5/10

    वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
    माचा चहा चयापचय (मेटॅबॉलिझम) वाढवतो आणि चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान करतो. त्यामुळे शरीराची ऊर्जा जास्त खर्च होते आणि चरबी कमी होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

  • 6/10

    यकृतासाठी (Liver) रक्षणकर्ताच!
    माचा टी यकृताची कार्यक्षमता सुधारतो आणि त्याचे संरक्षण करतो. विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि फॅटी लिव्हरसारख्या आजारांपासून बचाव करतो. त्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते.

  • 7/10

    कर्करोगापासून संरक्षण
    माचामध्ये EGCG आणि पॉलीफेनॉलसारखी शक्तिशाली अँटी-कॅन्सर संयुगे असतात. ही संयुगे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यास मदत करतात. अजून संशोधन सुरू असले तरी सुरुवातीचे परिणाम सकारात्मक आहेत.

  • 8/10

    त्वचेला नैसर्गिक चमक
    माचा टीमधील कॅटेचिन्स त्वचा उजळवतात आणि कोलेजनची पातळी सुधारतात. त्यामुळे त्वचा आतून व बाहेरून अशा दोन्ही प्रकारे तजेलदार, मऊ व निरोगी राहते.

  • 9/10

    मेंदू अधिक सक्रिय ठेवतो
    माचातील एल-थियानिन आणि थोड्या प्रमाणातील कॅफिन यांमुळे मेंदूचे कार्य सुधारते. त्यामुळे लक्ष केंद्रित होणं, स्मरणशक्ती आणि मानसिक तणाव न वाढवता, विचार करण्याची क्षमता वाढते.

  • 10/10

    हृदयासाठी फायदेशीर पेय
    माचा टी वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतो आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची (HDL) पातळी वाढवतो. तो रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आणि हृदयरोगाचा धोका कमी करतो. त्यातील फ्लेवोनॉइड्समुळे जळजळ कमी होऊन, दातांचेही संरक्षण होते.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Matcha tea benefits and reasons behind its growing consumption svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.