-
पावसाळा सुरू झाला की, दमट हवामान, सतत भिजणे व घाम यांमुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. अनेकांना यामध्ये खाज येणे, लालसरपणा, अॅलर्जी, रॅशेस, पुरळ यांसारखे त्रास जाणवतात. या त्रासांपासून नैसर्गिकरीत्या संरक्षण करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, जे आपण दररोजच्या अंघोळीत अमलात आणू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कडुलिंबाची पाने
पहिला आणि सर्वाधिक प्रभावी उपाय म्हणजे कडुलिंबाची पाने. या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. काही पाने पाण्यात उकळून, ते पाणी अंघोळीसाठी वापरल्यास त्वचेवरील संसर्ग, खाज व पुरळ यांसारख्या त्रासामध्ये फायदा होतो. (फोटो सौजन्य: @Freepik) -
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईल हा आणखी एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असून त्वचेवरील मुरमांपासून ते इतर बॅक्टेरियामुळे होणाऱ्या त्रासांवर ते उपयुक्त आहे. फक्त ४-५ थेंब अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने त्वचा स्वच्छ आणि जंतुमुक्त राहते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
गुलाबपाणी
गुलाबपाणीदेखील त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ते त्वचेला थंडावा देते आणि अॅलर्जीचा त्रास कमी करते. अंघोळीच्या पाण्यात दोन चमचे गुलाबपाणी मिसळल्यास त्वचा मऊ आणि ताजी राहते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हे घरगुती; पण प्रभावी साधन आहे. त्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने खाज, पुरळ किंवा त्वचेची जळजळ कमी होते. अर्धा चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून अंघोळ केल्यास त्वचेला आराम मिळतो. (फोटो सौजन्य: @Freepik) -
हळद
अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळणे हा पारंपरिक; पण उपयुक्त उपाय आहे. हळदीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असून, ती त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. विशेषतः सूज, खाज किंवा लालसरपणा असल्यास हळद उपयोगी ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
एरंडेल तेल
पावसाळ्यात त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी एरंडेल तेल (Castor Oil) वापरता येईल. हे तेल त्वचेला पोषण देते आlणि ओलसर हवामानातही त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवते. (फोटो सौजन्य: @Freepik) -
संध्याकाळची अंघोळ
या सर्व उपायांसोबतच एक महत्त्वाची सवय म्हणजे संध्याकाळी अंघोळ करणं. दिवसभर धूळ, घाम व बॅक्टेरिया यांच्या संपर्कात आल्यावर संध्याकाळी अंघोळ केल्यास त्वचा ताजीतवानी राहते आणि संसर्ग रोखता येतो. (फोटो सौजन्य: @Freepik) -
या घरगुती उपायांचा वापर नियमित केला, तर पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या सहजपणे टाळता येतात. मात्र, त्रास खूप वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
(Disclaimer : वरील उपाय सर्वसामान्यांसाठी आहेत. पण, त्वचा संवेदनशील असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्रास वाढल्यास वापर थांबवा.)
पावसाळ्यात खाज, अॅलर्जी व रॅशेसचा त्रास? अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘या’ ७ नैसर्गिक गोष्टी
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे त्वचेवर खाज, अॅलर्जी, रॅशेस यांसारख्या समस्या होऊ शकतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब, टी ट्री ऑईल, गुलाबपाणी यांसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापरामुळे आपल्याला त्वचेच्या सुरक्षित आणि ताजेपणाचा अनुभव मिळतो.
Web Title: Natural home remedies for skin allergy and rashes in monsoon bath care tips svk 05