-
पावसाळ्यात फळे आणि भाज्यांपासून होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. कारण- पावसाळा सुरू होताच हवामानातील ओलावा आणि आर्द्रता खूप वाढते. अशा वातावरणात फळे आणि भाज्यांमध्ये बुरशी, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंना वाढायला पोषक परिस्थिती मिळते. त्यामुळे दूषित अन्न खाल्ल्यास फूड पॉयजनिंग, उलट्या, जुलाब किंवा पचनाचे इतर त्रास होण्याची शक्यता १० पटींनी वाढते. (स्रोत: फ्रीपिक)
-
पालेभाज्या आरोग्यदायी; पण पावसात धोकादायक!
पालक, कोथिंबीर, कोबी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये सतत आर्द्रता असते आणि जमिनीतील परजीवी त्यात राहू शकतात. पावसाळ्यात या भाज्या सहजपणे सडू शकतात. अशा भाज्यांमध्ये जीवाणू, कीटकांची अंडी किंवा परजीवी असण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे पोट फुगणे, अॅसिडिटी किंवा जंतसुद्धा होऊ शकतात. (स्रोत: फ्रीपिक) -
‘या’ भाज्या पावसात शक्यतो टाळा
टोमॅटो, वांगी, मशरूम, फुलकोबी व कोबी अशा भाज्या पावसाळ्यात लवकर खराब होतात आणि त्यात बुरशी तयार होते. या भाज्या नीट स्वच्छ न केल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अशा काळात त्या कमी खाणं किंवा व्यवस्थित शिजवूनच खाणं सुरक्षित ठरतं. (स्रोत: पेक्सेल्स) -
हिरव्या भाज्या धुण्याची योग्य पद्धत वापरा
पालेभाज्या स्वयंपाकात वापरण्यापूर्वी त्या मिठाच्या पाण्यात १५-२० मिनिटे भिजवा. त्यामुळे त्यामधील जीवाणू, कीटक व मातीचे कण निघून जातात. या साध्या पद्धतीने तुम्ही पचनाचे अनेक त्रास टाळू शकता. (स्रोत: फ्रीपिक) -
कीटकनाशकांपासून वाचायचंय? हे उपाय करा
फळे आणि भाज्यांना फक्त पाण्याने धुणे पुरेसे नाही. त्या व्हिनेगर किंवा बेकिंग सोड्याच्या द्रावणात १५ मिनिटे भिजवल्यास त्यावरील कीटकनाशकांचे अंश कमी होतात. शक्य असल्यास त्या सोलून खा. कारण- बरेचसे विषारी थर फळे अन् भाज्यांच्या सालीवरच असतात. (स्रोत: फ्रीपिक) -
पालेभाज्यांऐवजी भोपळ्याला द्या थोडे अधिक स्थान!
पावसात पालेभाज्या टाळणे चांगले. त्याऐवजी भोपळा, दुधी, लाल भोपळा अशा प्रकारांच्या भाज्या निवडा. त्या स्वच्छ शिजवल्या की, सुरक्षित असतात. पराठा, भाजी, सूप, रायता यांमध्ये भोपळ्याचा वापर करून, स्वादासह पोषण मूल्य सहजपणे वाढवता येते. (स्रोत: पेक्सेल्स) -
फक्त धुणे नाही; योग्य पद्धतीने स्वच्छता करा
भाज्या किंवा फळे थंड वाहत्या पाण्याखाली नीट धुवा. ज्या भाज्यांना कडक साले असतात, त्या स्वच्छ करायला भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणारा ब्रश वापरा. ही कीटकनाशके आणि मातीचे अंश दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. (स्रोत: पेक्सेल्स)
पावसाळ्यात करू नका तब्येतीचा घात! ‘या’ भाज्या ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या….
पावसाळ्यात फळे-भाज्या खाण्यापूर्वी सावध राहा. दूषित अन्नामुळे पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. पालेभाज्यांऐवजी भोपळा, दुधी अशा भाज्या निवडा आणि स्वच्छता राखण्यासाठी मिठाचे पाणी, व्हिनेगर व भाजी-ब्रश वापरा.
Web Title: Monsoon 2025 food safety vegetables to avoid cleaning tips svk 05