-
“रोज एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवते” या प्रचलित ओळीप्रमाणे सफरचंद आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे. सफरचंद आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने युक्त असून, सफरचंद आपल्या आरोग्याला अनेक फायदे देते.
(फोटो सौजन्य: Freepik) -
हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे यांनी सफरचंदाचे अनेक फायदे सांगितले आहेत.
(फोटो सौजन्य: Freepik) -
डॉ. गुडे यांच्या मते, सफरचंद हे पौष्टिकतेचे एक शक्तिशाली साधन आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती व कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन-सी यासह भरपूर जीवनसत्त्वे असतात. ते पोटॅशियमचा एक उत्कृष्ट स्रोतदेखील आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्याव्यतिरिक्त, सफरचंदांमध्ये फायबर असते, जे पचनास मदत करते, वजन व्यवस्थापनात योगदान देते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. गुडे म्हणाले की, सफरचंदांचे आरोग्यदायी फायदे त्यांच्या पौष्टिकतेपेक्षा खूप जास्त आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सफरचंदांमधील अँटीऑक्सिडंट्स, क्वेरसेटिन व फ्लेवोनॉइड्स, हृदयरोग, टाईप २ मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगासह दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्याशिवाय त्यांनी असेही म्हटले की, सफरचंदांमधील फायबरमुळे पोट भरल्याची भावना वाढवून आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून वजन व्यवस्थापनात योगदान देते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
या बहुपयोगी फळाचे पूर्णपणे फायदे घेण्यासाठी, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सफरचंदांचा समावेश करण्याचा विचार करायला हवा. डॉ. गुडे म्हणाले की, स्नॅक म्हणून ताजे सफरचंद खा, सॅलड किंवा ओटमिलमध्ये सफरचंदाचे तुकडे घाला. सफरचंद तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवून, तुम्ही तुमचे एकूण आरोग्य सुदृढ करू शकता.(फोटो सौजन्य: Freepik)
-
सफरचंद ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी ते रेफ्रिजरेटरमध्ये योग्य रीतीने साठवा.(फोटो सौजन्य: Freepik)
-
कीटकनाशकांचा संपर्क कमी करण्यासाठी शक्य असेल तेव्हा सेंद्रिय सफरचंद निवडा. कीटकनाशकांचे कोणतेही अवशेष काढून टाकण्यासाठी सफरचंद खाण्यापूर्वी ते चांगले धुवा. (फोटो सौजन्य: Freepik)
दररोज एक सफरचंद खाल्ल्याने काय होते?
Apple Health Benefits: सफरचंद आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने युक्त असून, सफरचंद आपल्या आरोग्याला अनेक फायदे देते.
Web Title: What happens if you eat an apple every day sap