-
सध्या मधुमेह, रक्तदाब आणि मायग्रेनसारख्या आजारांनी अनेक लोक त्रस्त आहेत. चुकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार ही यामागची प्रमुख कारणं आहेत. विशेषतः मायग्रेनमुळे होणारी तीव्र डोकेदुखी खूप त्रासदायक असते. पण, आयुर्वेदामध्ये यावर सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत.
-
आले
आल्यामध्ये दाह कमी करणारे गुण असतात. आल्याचा चहा किंवा एक चमचा आल्याचा रस मधात मिसळून घेतल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. -
जिरे आणि धणे
जिरे आणि धणे समप्रमाणात वाटून त्याची पूड तयार करा. ही पूड एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून रोज घ्या. पचन सुधारल्याने मायग्रेनचा त्रास आपोआप कमी होतो. -
तीळ तेल
तीळ तेलामध्ये हळद मिसळून डोक्यावर आणि कपाळावर सौम्य मालिश करा. यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा, यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि डोकेदुखी कमी होते.. -
पाणी
शरीरात पाण्याची कमतरता ही देखील मायग्रेनची एक शक्यता असते. त्यामुळे दिवसातून पुरेसे पाणी प्या. नारळपाणीही यासाठी उपयुक्त ठरते. -
योग व प्राणायाम
दररोज १०-१५ मिनिटे अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला ऑक्सिजन मिळतो. याचा थेट फायदा मायग्रेनवर होतो. -
आहार आणि जीवनशैली
तूप, तेलकट, मसालेदार आणि जड पदार्थ टाळा. वेळेवर जेवण, पुरेशी झोप, ध्यान आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारल्यास मायग्रेनपासून सुटका मिळू शकते.
मायग्रेनपासून पूर्ण आराम! आयुर्वेदातील ‘हे’ ६ सोपे उपाय आजच वापरून पाहा
मायग्रेनच्या डोकेदुखीवर आयुर्वेदिक उपचार | मायग्रेनमुळे धोकादायक डोकेदुखी होते. आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत जे या आजारापासून आराम मिळविण्यात मदत करू शकतात. येथे जाणून घ्या.
Web Title: Ayurvedic natural home remedies for migraine headache relief svk 05