-
सतत केस गळती होत आहे? केस वाढत नाहीत? बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्स वापरूनही फरक जाणवत नाही? मग हे घरगुती उपाय नक्कीच उपयुक्त ठरतील. (फोटो सौजन्य : FreePik)
-
१. कांद्याचा रस थेट मुळांवर : कांद्यामध्ये सल्फर भरपूर असतो, जो केसांच्या कुपिकांना पोषण देतो. आठवड्यातून दोन वेळा कांद्याचा रस लावल्याने नवीन केसांची वाढ झपाट्याने होते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
२. भिजवलेले मेथी दाणे वाटून वापरा : मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड असतात, जे केसांची गळती थांबवतात आणि वाढीस मदत करतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
३. झोपताना केस बांधू नका : रात्री केस मोकळे ठेवावेत. घट्ट पोनीटेलमुळे केस तुटतात आणि कूप कमजोर होतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
४. कापसाने तेल लावा, बोटांनी नाही : बोटांनी तेल लावताना केस ओढले जातात. त्याऐवजी कापसाच्या साहाय्याने सौम्यपणे तेल लावावे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
५. गरम तेलाने मसाज करा : गरम खोबरेल किंवा बदाम तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि केस मुळांपासून मजबूत होतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
६. दर आठवड्याला केसांना ‘डेप क्लिनिंग’ : दूषिततेमुळे आणि प्रॉडक्ट बिल्डअपमुळे स्काल्पवर थर साचतो. आठवड्यातून एकदा सौम्य नैसर्गिक क्ले किंवा अॅपल सायडर व्हिनेगरने केस स्वच्छ करा. (फोटो सौजन्य : FreePik)
-
७. नारळ पाणी आणि तुळशीचा रस : हे दोन्ही घटक केसांमध्ये बुरशी आणि डेंड्रफ दूर ठेवतात, त्यामुळे केस गळती कमी होते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
८. केसांना चहा नव्हे, ग्रीन टीचे पाणी : ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असते. याचा थंड अर्क केसांवर शिंपडल्यास मुळांवर उत्तम परिणाम होतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
९. रात्रभर अंड्याचा मास्क : अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असते. अर्ध्या तासासाठी केसांना अंड्याचा मास्क लावा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. (फोटो सौजन्य : FreePik)
-
१०. आहारात ‘हे’ घटक वाढवा : प्रोटीन, झिंक, बायोटिन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. अंडी, बीट, सुकामेवा, पालक आणि दह्याचा आहारात समावेश करा. (फोटो सौजन्य : FreePik)
टीप : हे उपाय वैयक्तिक अनुभवावर आधारित आहेत. त्वचेची संवेदनशीलता लक्षात घेऊनच वापरावे. अॅलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जाड व लांबसडक केस हवेत? मग ‘हे’ १० घरगुती उपाय नक्की करून पाहा…
केस गळती, कमजोर मुळे आणि वाढ न होणं हे सगळं टाळायचं असेल तर बाजारातले महागडे उपाय नाही, तर घरच्या घरी करता येणारे ‘हे’ १० सोपे आणि परिणामकारक उपाय वापरून पाहा. कांद्याचा रस, मेथीचा लेप, अंड्याचा मास्क आणि गरम तेल मसाज अशा नैसर्गिक उपायांनी केस होतात दाट आणि मजबूत!
Web Title: Follow these 10 natural tips hair growth long home remedies svk 05