-
आरोग्य टिप्स :
आपल्या पचनसंस्थेत लहान आणि मोठे अशा दोन प्रकारच्या आतड्यांचा समावेश असतो. लहान आतडे अन्न पचवून पोषणद्रव्ये शोषते, तर मोठे आतडे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शोषून विष्ठा बाहेर टाकण्याचे काम करते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी दोन्ही आतड्यांच्या तंदुरुस्त असण्याला खूप महत्त्वआहे. त्यासाठी सकाळी पौष्टिक आणि पचायला हलकं अन्न खाणं फायदेशीर ठरतं. आज आपण अशा पाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे आतड्यांचं आरोग्य सुधारायला मदत करतात. (फोटो – फ्रीपिक) -
अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडोमध्ये भरपूर फायबर आणि निरोगी चरबी असते. फायबरमुळे पचन सुरळीत राहते आणि आतड्यांची हालचाल नियमित होते; तर चरबी आतड्यांचे संरक्षण करते. त्यामुळे त्याला योग्य ते पोषण मिळते. (प्रतिमा – फ्रीपिक) -
केळी
केळीमध्ये नैसर्गिक प्रो-बायोटिक्स असतात, जे पचनासाठी फायदेशीर जीवाणूंना पोषण देतात. बदाम बटरसोबत केळी खाल्ल्यास प्रथिने आणि चरबीही मिळते, जे शरीरासाठी उपयुक्त आहे. (प्रतिमा – फ्रीपिक) -
चिया बिया
चिया बिया म्हणजे फायबरचा खजिना. त्या पचन सुधारतात, पोट फुगणं कमी करतात आणि चांगल्या जीवाणूंना मदत करतात. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडही असते, ज्यामुळे सूज कमी होते. चिया बिया दुधात भिजवून फळांसोबत खा. (प्रतिमा – फ्रीपिक) -
ग्रीक दही
ग्रीक दहीमध्ये भरपूर प्रो-बायोटिक्स असतात, जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना वाढवतात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि पचनसंस्था सुधारते. साखर नसलेलं दही घ्या आणि त्यात फळं, काजू किंवा मध टाका. (फोटो – फ्रीपिक) -
ओट्स
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचं फायबर असतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि पचनासाठी उपयोगी ठरतं. त्यात फ्लॅक्ससीड मिसळा आणि वरून बेरी टाका. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि पचनक्रिया सुरळीत होईल. (फोटो – फ्रीपिक)
आतड्यांचं आरोग्य सुधारायचंय? मग ‘हे’ पदार्थ सकाळी नक्की खा…
आतड्यांचं आरोग्य राखण्यासाठी सकाळच्या आहारात फायबर आणि प्रो-बायोटिक्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. अॅव्होकॅडो, केळी, चिया बिया, ग्रीक दही व ओट्स हे पचन सुधारण्यास आणि आतड्यांना तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.
Web Title: These 5 best morning foods for healthy gut and easy digestion tips svk 05