-
पावसाळा आणि आजारांची शक्यता
पावसामुळे उन्हाळ्यातील काहिली होणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळतो; पण त्याच वेळी विविध आजारांचं प्रमाणही वाढतं. उच्च आर्द्रता, साचलेलं पाणी व तापमानातील चढ-उतार यांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वाढते. -
मलेरिया
हा आजार अॅनाफिलीस डासांमुळे होतो, जे साचलेल्या पाण्यात वाढतात. त्याची लक्षणं म्हणजे ताप, थंडी वाजणं, डोकेदुखी व घाम येणं. योग्य वेळी उपचार न केल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. (प्रतिमा: पिक्साबी) -
काय कराल?
घराभोवती पाणी साचू देऊ नका. झोपताना मच्छरदाणी वापरा आणि गरज असल्यास कीटकनाशकाची फवारणी करा. (प्रतिमा: पिक्साबी) -
सर्दी आणि फ्ल्यू
पावसाळ्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि सर्दी, खोकला, फ्ल्यू होण्याची शक्यता वाढते. या आजारांपासून बचाव करण्यासाठी शरीर गरम ठेवणं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा आहार घेणं गरजेचं आहे. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
श्वसनाचा त्रास
थंड हवामान, दमटपणा व वारंवार होणारा हवामानातील बदल यांमुळे घसा खवखवणं, नाक बंद होणं, खोकला आणि कधी कधी ब्राँकायटिसचाही त्रास होतो. (प्रतिमा: पेक्सेल्स/पिक्साबी) -
लेप्टोस्पायरोसिस
हा संसर्ग उंदरांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्यामुळे होतो. त्यामुळे ताप, स्नायुदुखी, उलट्या, डोळे लाल होणं अशी लक्षणं दिसतात. उघड्या जखमा असताना साचलेल्या पाण्यातून जाणं टाळा. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
काय काळजी घ्याल?
नेहमी पादत्राणं घाला, विशेषतः साचलेलं पाणी असलेल्या भागात. अशा पाण्याचा संपर्क आल्यावर उदभवू शकणाऱ्या संभाव्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. -
बुरशीजन्य संसर्ग
हवेतील आर्द्रतेमुळे पाय, काखा, मांड्या, बोटे यांमधील जागांमध्ये बुरशीजन्य संसर्गाचा धोका असतो. त्यापासून खाज, पुरळ, नखांमध्ये बिघाड, असे त्रास होऊ शकतात. (प्रतिमा: पिक्साबी) -
काय उपाय कराल?
त्वचा कोरडी ठेवा. ओले कपडे लवकर बदला. अँटीफंगल पावडर वापरा आणि ओले मोजे, बूट वापरणं टाळा. (प्रतिमा: पिक्साबी) -
डेंग्यू आणि चिकनगुनिया
हे दोन्ही आजार एडीस डासांमुळे होतात, जे स्वच्छ पाण्यात वाढतात. याची लक्षणं म्हणजे ताप, सांधेदुखी, पुरळ आणि थकवा. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
डासांपासून संरक्षण
डासांपासून वाचण्यासाठी पाणी साठणारी भांडी रिकामी ठेवा, मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधकाचा वापर करा. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
टायफॉइड आणि हेपॅटायटिस ए
पावसामुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे टायफॉईड किंवा हेपॅटायटिस ए होऊ शकतो. त्यामध्ये ताप, कावीळ, मळमळ, थकवा, अशी लक्षणं दिसतात. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
स्वच्छ पाणी आणि अन्नाचे सेवन
नेहमी उकळलेलं किंवा फिल्टरचं पाणी प्या. बाहेरचं दूषित अन्न टाळा. अशक्तपणा वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. (प्रतिमा: पेक्सेल्स)
पावसाळ्याबरोबर आजारही येतात; या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्याल?
पावसाळ्यात साचलेलं पाणी, ओलसर हवामान व तापमानातील बदलामुळे आजारांची शक्यता वाढते. मलेरिया, डेंग्यू, सर्दी-खोकला टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
Web Title: Monsoon 2025 diseases and health tips for rainy season svk 05