-
आपल्या धावपळीच्या जीवनात दिवस कसा गेला याचा विचार करायला आपल्याकडे वेळच नसतो. पण, रोज फक्त पाच मिनिटांचं आत्मचिंतन तुमचे विचार, भावना आणि निर्णय सुधारू शकते.
-
दररोज नवीन काहीतरी शिकण्याची संधी
प्रत्येक दिवस हे शिकण्याचं एक नवं पान असतं. जर आपण दिवसातल्या चुका ओळखल्या नाहीत, तर त्या पुन्हा घडतात. स्वतःला ओळखण्यासाठी तीन सोप्पे प्रश्न विचारा –
१. आज मी माझं सर्वोत्तम दिलं का?
२. काही असं होतं का, जे मी अधिक चांगल्या प्रकारे करू शकलो/शकले असते?
३. माझ्या कोणत्या सवयी बदलायला हव्यात? -
स्वतःची समीक्षा ही यशस्वी लोकांची सवय आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेटपटू विराट कोहलीसारखे लोकही याला महत्त्व देतात. विराट म्हणतो, “प्रत्येक सामन्यानंतर मी स्वतःला विचारतो, अजून काय चांगलं करता आलं असतं?”
-
स्वतःला जाणून घेण्यासाठी काही सोप्प्या टिप्स
रात्री झोपण्याआधी ५-१० मिनिटे निवडा. एक शांत जागा शोधा. दिवसभर काय केलं, काय वाटलं आणि काय शिकलो हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारा.
थोड्या वेळातच तुम्हाला तुमचं खरं रूप समजायला लागेल आणि आयुष्य जास्त सजगपणे जगता येईल. -
स्वतःची समीक्षा म्हणजे स्वतःला दोष देणं नाही, तर स्वतःच्या विचारांमध्ये स्पष्टता आणणं. सतत एकाच गोष्टीवर विचार करून स्वतःला थकवू नका. आत्मचिंतन करणारे लोक भावनिकदृष्ट्या मजबूत असतात आणि आपल्या सवयींवर हळूहळू नियंत्रण मिळवतात. ही छोटी सवय आयुष्यात मोठा फरक घडवते.
-
लिहा किंवा मनात विचार करा, पण स्वतःला दोष देऊ नका
डायरी लिहा किंवा मनात विचार करा – दोन्ही उपयोगी. चुका मान्य करा, पण स्वतःवर कठोर होऊ नका. दररोज १% सुधारणा ही यशाकडे नेणारी खरी वाट असते. -
स्वतःला भेटा शांततेत, प्रामाणिकपणे
एका व्यस्त दिवसानंतर स्वतःला शांततेत भेटा – हीच खरी भेट असते. ही सवय तुमचं अंतरंग दाखवते आणि प्रेमाने सुधारण्याची संधी देते. आयुष्यात परिपूर्ण होणं गरजेचं नाही, पण दररोज थोडं चांगलं होणं हेच खरे यश आहे. -
हे तीन प्रश्न विचारा आणि स्वतःला ओळखा
‘मी काय चांगले केले?’, ‘मी कुठे चुकलो?’, ‘उद्या मी काय सुधारले पाहिजे?’ हे छोटे प्रश्न वाटतील, पण त्यांची उत्तरे तुमचं आयुष्य बदलू शकतात. जेव्हा हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारता, तेव्हा तुमच्या आतील गोंधळ, पश्चात्ताप, भीती दूर होऊ लागते आणि खरी शांतता मिळते..
आत्मचिंतन तुमचं जीवन बदलू शकतं; रोज स्वतःला विचारा ‘हे’ प्रश्न
रोज फक्त पाच मिनिटांचं आत्मचिंतन तुमचं जीवन बदलू शकतं. दिवसात काय शिकलो, काय चुकलो आणि काय सुधारता येईल हे स्वतःला विचारल्याने विचार आणि निर्णय स्पष्ट होतात. ही सवय तुमचं अंतरंग उघडते, आत्मविश्वास वाढवते आणि आयुष्य अधिक सजगपणे जगायला शिकवते.
Web Title: Follow these steps to know yourself and reduce daily stress svk 05