• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these 7 simple ways to strengthen your relationship with love and trust svk

प्रेमात घट्ट नातं हवंय? ‘हे’ ७ मार्ग वाढवतील नात्यातील विश्वास आणि आपुलकी

नातं प्रेमावर टिकतं; पण विश्वास, संवाद व स्वीकार यांच्याशिवाय ते खोलवर नातं बनू शकत नाही. नातेविषयक तज्ज्ञ स्मृती आहुजा यांनी सांगितलेल्या या सोप्या टिप्समुळे तुमचं नातं विराट आणि अनुष्कासारखं मजबूत होऊ शकतं. या टिप्स फक्त वाचू नका, तर आचरणात आणा.

July 16, 2025 12:41 IST
Follow Us
  • Healthy Relationship Tips
    1/9

    प्रेम आणि विश्वास
    पती-पत्नी असो की प्रियकर-प्रेयसी, कोणतेही नाते प्रेम व विश्वासावर टिकून असते. परंतु, अनेकदा भावनांची कमतरता असलेल्या नात्यांमध्येही दुरावा येतो. अशा वेळी नातं जपणं आणि ते अधिक घट्ट करणं गरजेचं असतं. (छायाचित्र: सोशल मीडिया)

  • 2/9

    तुमचं नातं अजून घट्ट करायचं असेल, तर नातेविषयक तज्ज्ञ स्मृती आहुजा यांनी सांगितलेल्या ७ सोप्या टिप्स फॉलो करा. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सवयी आत्मसात केल्यास तुमचं नातंही विराट कोहली आणि अनुष्का शर्मासारखं मजबूत होईल. (फोटो: फ्रीपिक)

  • 3/9

    शारीरिक आणि भावनिक प्रेम दाखवा
    नातं मजबूत करण्यासाठी केवळ उरी भावना बाळगून चालत नाही, तर त्या व्यक्त करणेही गरजेचे आहे. प्रेम, आपुलकी व काळजी शब्द आणि कृतीतून दाखवा.ते करताना समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलचा विश्वास अधिक गडद होतो. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 4/9

    समजून घ्या आणि ऐका
    नात्यात प्रेम हवे असेल, तर फक्त बोलणे पुरेसे नसते. समोरच्याचे शब्द, भावना व इच्छा शांतपणे ऐकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असे केल्याने त्या व्यक्तीला सुरक्षिततेची भावना मिळते आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा आत्मविश्वासही वाढतो. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 5/9

    छोट्या घटनांमध्ये मोठा आनंद शोधा
    तुमचा जोडीदार छोट्या गोष्टींमधून तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या क्षणांचा खरा आनंद घ्या. त्याचे कौतुक करा आणि त्याचे प्रयत्न ओळखा. अशा हळुवार वागणुकीमुळे नातेबंध अधिक गहिरे होतात. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 6/9

    बदल नाही; स्वीकार हवा
    नात्यात समोरच्या व्यक्तीला बदलवण्याचा आग्रह नको. त्याच्या गुण-दोषांसह त्याला जसा आहे तसा स्वीकारा. हा स्वीकार त्याच्यात मोकळेपणाची भावना निर्माण करतो आणि तुमच्याबद्दलचा आदरही वाढवतो. (प्रतिमा: फ्रीपिक)

  • 7/9

    संवाद तुटू देऊ नका
    कधी मतभेद झाले तरी एकमेकांशी बोलणं थांबवू नका. कारण- संवाद थांबला की, गैरसमज वाढतात. बोलून सगळं स्पष्ट करता आलं की, नातं अधिक मजबूत होतं. (प्रतिमा: फ्रीपिक)

  • 8/9

    अवाजवी नियंत्रणाऐवजी स्वातंत्र्य द्या
    आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचं स्वातंत्र्य हवं असतं. तुमचा जोडीदार काय करतो, कुठे जातो यावर अवाजवी नियंत्रण ठेवू नका. थोडंसं मोकळं आयुष्य दिलं, की विश्वास आपोआप वाढतो. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 9/9

    संयम ठेवा
    नातं मजबूत करायचं असेल, तर संयम फार महत्त्वाचा असतो. प्रेम, समजूत, विश्वास या सगळ्या गोष्टी वेळेनुसार वाढतात; फक्त थोडा संयम आणि सातत्य ठेवणं गरजेचं असतं. (प्रतिमा: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: These 7 simple ways to strengthen your relationship with love and trust svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.