-
शतकानुशतके भारतीय संस्कृतीत त्याचा औषधी आणि पौष्टिक फायद्यांसाठी वापर केला जात आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवणे असो किंवा पचनक्रिया सुधारणे असो; गुळाचे असंख्य फायदे आहेत, ज्यामुळे गूळ तुमच्या आहारात असणे फायद्याचे मानले जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गूळ शरीराला आवश्यक खनिजेच पुरवत नाही, तर तो खाल्ल्याने त्वचेपासून केसांपर्यंत अनेक सकारात्मक बदल दिसू लागतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्हाला तुमचे केस आणि त्वचा नैसर्गिक पद्धतीने निरोगी बनवायची असेल, तर सकाळी उठल्यानंतरच्या गुळासह पाणी पिण्यास सुरुवात करा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी घेऊन, त्यात सुमारे १०-१५ ग्रॅम शुद्ध देशी गूळ घाला. चव वाढविण्यासाठी तुम्ही त्यात लिंबाचे काही थेंबदेखील घालू शकता. त्यानंतर ते पाणी प्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चमकदार त्वचेसाठी गुळाचा तुकडा खा आणि वर एक ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गूळ आणि पाणी या दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्याने त्वचा साफ होते आणि कोलेजन बूस्टर म्हणून काम करतात, ज्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
एक तुकडा गूळ खाऊन पाणी प्यायल्याने केस काळे होण्यास मदत होते. गुळात भरपूर प्रमाणात लोह असतो, ज्यामुळे केस काळे होण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गुळात व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्सदेखील भरपूर प्रमाणात असते, जे कमकुवत केसांसाठी उपचार ठरू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्याशिवाय केसांसाठी गुळाचे इतर फायदे म्हणजे मॅग्नेशियम, पोटेशियम व झिंक ही खनिजे टाळूच्या आरोग्यात योगदान देतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. (फोटो सौजन्य: Freepik)
सकाळी उपाशीपोटी गुळासह एक ग्लास पाणी पिण्याचे फायदे
Water With a Jaggery: जर तुम्हाला तुमचे केस आणि त्वचा नैसर्गिक पद्धतीने निरोगी बनवायची असेल, तर सकाळी उठल्यानंतरच्या गुळासह पाणी पिण्यास सुरुवात करा.
Web Title: Benefits of drinking a glass of water with jaggery on an empty stomach sap