-
तुम्ही ‘या’ गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत, तर होऊ शकते गंभीर दुखापत!
सोशल मीडियावर काही अनुभवी ऑटो तज्ज्ञांनी पावसाळ्यात कारसंबंधी काही महत्त्वपूर्ण टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांच्या मते, या टिप्स पावसात गाडी चालवताना केवळ तुमच्यासाठीच नव्हे, तर तुमच्या कारसाठीसुद्धा अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. योग्य काळजी घेतल्यास तुमची कार सुरक्षित राहू शकते आणि अनावश्यक अपघातही टाळता येऊ शकतात. -
पावसाळ्यासाठी कार ड्रायव्हिंग टिप्स : देशभरात सध्या पावसाळा सक्रिय आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठलेले आहे. हे हवामान जरी आल्हाददायक वाटत असले तरी वाहनचालकांसाठी, विशेषतः कारचालकांसाठी – ते अनेक आव्हाने घेऊन येते. पावसात गाडी चालवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर तुमची आणि इतरांची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकते.
-
पावसात पाण्याखाली गेलेले रस्ते टाळा: काही गाड्या अशा रस्त्यांवरून जात असल्या तरी तुम्ही तशी जोखीम घेऊ नका. पाणी इंजिन किंवा एक्झॉस्टमध्ये गेल्यास गाडी बंद पडू शकते आणि रस्त्यातच अडकू शकते. त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. शक्य असल्यास दुसरा सुरक्षित रस्ता निवडा.
-
धोकादायक दिवे चुकीच्या वेळी वापरू नका : हे दिवे फक्त आपत्कालीन परिस्थितीत – जसे की गाडी बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास वापरायचे असतात. पावसात गाडी चालवताना हे दिवे लावल्यास इतर वाहनचालक गोंधळून जाऊ शकतात आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. धोकादायक दिवे चुकीच्या वेळी लावल्यास मागच्या ड्रायव्हरचा गोंधळ होऊ शकतो.
पावसात किंवा कमी प्रकाशात हेडलाइट्स आणि फॉग लॅम्प वापरा. त्यामुळे रस्ता आणि तुमचं वाहन स्पष्ट दिसू शकेल. -
वायपर नीट आहेत का ते तपासा : पावसात चांगलं दिसण्यासाठी वायपर नीट काम करणं गरजेचं आहे. जुने किंवा खराब वायपर असतील, तर ते बदलून टाका.
-
गाडी पाण्यात अडकली असेल, तर इंजिन सुरू करू नका: अनेकांना वाटते की गाडी सुरू करून, ती पाण्यातून बाहेर काढता येईल; पण हे चुकीचे आहे. अशा वेळी इंजिन सुरू केल्यास हायड्रॉलॉक होऊ शकतो. त्याचा अर्थ म्हणजेच पाणी इंजिनाच्या ज्वलन कक्षात जाते आणि त्यामुळे इंजिनाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गाडी सुरू करण्याऐवजी ती बाहेर काढण्यासाठी मदतीचा पर्याय निवडा.
-
पावसाळ्यात झाडाखाली गाडी पार्क करू नका: अनेकदा लोक रस्त्याच्या कडेला झाडाखाली गाडी लावतात. कारण ती जागा सावलीची वाटते. पण, पावसाळ्यात ही सवय धोकादायक ठरू शकते. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्यास झाडाची फांदी तुटून गाडीवर कोसळू शकते, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. शक्य असल्यास उघड्या व सुरक्षित जागेत गाडी पार्क करा.
-
ब्रेक्सची कार्यक्षमता तपासा : पावसात गाडी चालवल्यानंतर ब्रेक्स ओले होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पाण्यातून गेल्यानंतर थोडं अंतर गाडी चालवत हलके ब्रेक दाबा. त्यामुळे ब्रेक्स कोरडे होतील आणि ते नीट काम करतील.
-
टायरमध्ये पुरेसा हवा दाब ठेवा : पावसात रस्ता ओला असतो. त्यामुळे गाडी घसरण्याची शक्यता वाढते. टायरमध्ये हवेचा योग्य दाब असेल, तर गाडी रस्त्यावर जास्त मजबूत पकड घेते.
Photos: पावसाळ्यात गाडी चालवताना लक्षात ठेवा या टिप्स – ड्रायव्हर्ससाठी खास!
Drive Smart This Monsoon: जे लोक नुकतेच कार चालवायला शिकले आहेत किंवा जे अजूनही सराव करत आहेत, त्यांच्यासाठी पावसाळ्यात वाहन चालवणे अधिक धोकादायक ठरू नये यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स शेअर केल्या आहेत.
Web Title: Drive smart this monsoon must know tips for all drivers ama 06