• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. corn silk tea for liver and kidney health ayurvedic truth or trend ama

Photos: कॉर्न सिल्क टी: यकृत व मूत्रपिंडासाठी आयुर्वेदिक रामबाण की केवळ भ्रम? वाचा तपशिलात

Corn Silk Tea for Liver and Kidney Healt; कॉर्न सिल्क टी: यकृत व मूत्रपिंडासाठी आयुर्वेदिक रामबाण की केवळ भ्रम? वाचा तपशिलात

August 1, 2025 16:36 IST
Follow Us
  • corn tea
    1/9

    शेफ जसप्रित सिंग देवगुन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलंय “हे एक नैसर्गिक, सोपं आणि खरंच प्रभावी पेय आहे. कोणतंही केमिकल नाही, ना महागडे पदार्थ, फक्त स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या गोष्टींनी बनलेलं. चांगल्या आरोग्यासाठी पाणी प्या.

  • 2/9

    सोशल मीडियावर नवनवीन दावे दिसतात. कधी आश्चर्य वाटतं, तर कधी धक्का! सध्या एक नवीन दावा चर्चेत आहे, ‘कॉर्न सिल्क टी’ म्हणजेच मका पानांचं पाणी, हे किडनी स्टोन आणि मूत्राशयाच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे.

  • 3/9

    या दाव्यामागे काही तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांची मदत घेतली. ठाणे येथील किम्स हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. गुलनाज शेख म्हणाल्या, “होय, कॉर्न सिल्कचा वापर अनेक पिढ्यांपासून पारंपरिक उपचारांमध्ये केला जातो, विशेषतः मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या आरोग्यासाठी. यात नैसर्गिक फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारखी संयुगे असतात, जी लघवीच्या मार्गातील जळजळ कमी करतात आणि लघवीस चालना देण्यास मदत करतात.”

  • 4/9

    डॉ. गुलनाज शेख सांगतात की, काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, कॉर्न सिल्क मूत्रपिंडाच्या कार्यास मदत करू शकते आणि लहान दगड बाहेर टाकण्यास उपयुक्त ठरू शकते. मात्र, त्या स्पष्टपणे सांगतात – “कॉर्न सिल्क टी हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही, तो केवळ एक पूरक उपाय ठरू शकतो, विशेषतः जेव्हा दगड मोठे असतात किंवा त्यामुळे वेदना होत असतात, तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.”

  • 5/9

    कॉर्न सिल्कचे आणखी फायदे आहेत का? हो. डॉ. गुलनाज शेख सांगतात, “हे मूत्राशयातील जळजळ, शरीरात पाणी साचणे आणि सौम्य युरिन इन्फेक्शनसाठी उपयोगी ठरू शकते. काही महिलांना पीएमएसदरम्यान होणाऱ्या फुगण्यावरही याचा फायदा होतो.” पण त्या स्पष्टपणे सांगतात, “हा उपाय सौम्य आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याचा पर्याय नाही.”

  • 6/9

    कॉर्न सिल्क टी पिणे सर्वांसाठी सुरक्षित आहे का? डॉ. गुलनाज शेख सांगतात, “सर्वसाधारणपणे ही टी निरोगी व्यक्तींना मर्यादित प्रमाणात सुरक्षित असते, पण ती प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही.”

  • 7/9

    कधी काळजी घ्यावी? डॉ. गुलनाज शेख म्हणतात, “ज्यांना कमी रक्तदाब, मधुमेह आहे किंवा जे मूत्रवर्धक किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत, त्यांनी कॉर्न सिल्क टी नियमितपणे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.” त्याचबरोबर त्या सांगतात, “या टीचा काही औषधांवर परिणाम होऊ शकतो आणि क्वचित अ‍ॅलर्जीची शक्यताही असते.”

  • 8/9

    कॉर्न सिल्क वापरण्यापूर्वी तो नीट धुवून वाळवावा, म्हणजे त्यावरील घाण आणि कीटकनाशके निघून जातील. हा टी ताजा आणि गरम पिणे उत्तम आणि शक्यतो गोड पदार्थांशिवाय. दररोज १-२ कप पुरेसे आहे; जास्त घेतल्यास इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात. अ‍ॅसिड रिफ्लक्स असणाऱ्यांनी लिंबू टाळावं. योग्य प्रमाणात घेतल्यास हा टी फायदेशीर ठरू शकतो.

  • 9/9

    कॉर्न सिल्क टी हे पारंपरिक घरगुती उपाय आधुनिक आरोग्याला कसा आधार देऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे – जर ते सूज्ञपणे आणि संतुलितपणे वापरलं गेलं, तर. डॉ. गुलनाज शेख यांचा सल्ला स्पष्ट आहे – “जर काही शंका असेल, विशेषतः तुम्हाला आधीपासून वैद्यकीय समस्या असतील तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.”

TOPICS
आयुर्वेदिक उपचारAyurvedic Treatmentडॉक्टरDoctorसोपे घरगुती उपायEasy Home Remedies

Web Title: Corn silk tea for liver and kidney health ayurvedic truth or trend ama06

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.