-
बदाम (Almonds) बदाम हे फायबर आणि प्रोटीन यांनी भरलेले असतात. थोडेसे बदाम खाल्ल्यास पोट भरल्यासारखं वाटतं आणि सतत खाण्याची इच्छा कमी होते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
अक्रोड (Walnuts) ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असलेले अक्रोड वजन कमी करण्यात मदत करतात आणि मानसिक स्वास्थ्यही सुधारतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
काजू (Cashews) काजूमध्ये मॅग्नेशियम असते, जे शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत करते आणि त्यामुळे चरबी जलद जळते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
पिस्ता (Pistachios) पिस्ता कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असलेले ड्रायफ्रूट आहे. हे खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
जवस (Flaxseeds) जवसामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. ते घटक पचनसंस्था सुधारतात आणि वजन कमी करण्यास हातभार लावतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
चिया बिया (Chia Seeds) चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. पाण्यात भिजवल्यावर या बिया पोट भरल्याची भावना करून देतात. त्या वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. (फोटो सौजन्य : FreePik)
-
सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds) सूर्यफुलाच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीरात चरबी जमा होण्यापासून रोखतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) हे झिंक आणि मॅग्नेशियमने भरलेले असतात. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने भूक कमी होते आणि शरीरातील ऊर्जाही टिकून राहते. (फोटो सौजन्य : FreePik)
वजन कमी करायचंय? मग ‘हा’ सुका मेवा आणि ‘या’ बिया जरूर खा!
फक्त एक मूठ पुरेशी! बदाम, अक्रोड, अळशीसारख्या सुक्या मेव्यात दडलाय वजन कमी करण्याचा नैसर्गिक उपाय
Web Title: Simple and effective nuts and seeds to help in natural weight loss tips svk 05