-
नॉन-स्टिक आणि एअर-फ्रायरसारखी भांडी वापरण्याचे प्रमाण वाढत असताना लोक पुन्हा मातीच्या भांड्यांकडे परतत आहेत. मातीची भांडी नैसर्गिक चव आणि निरोगी पर्याय देतात. आज बाजारात अनेक प्रकारच्या मातीच्या भांड्यांची उपलब्धता आहे.
-
मातीच्या भांड्यांचे मूल्य कमी असले तरी त्यात स्वयंपाकाचे अनेक फायदे आहेत. मातीच्या भांड्यांत उष्णता दीर्घकाळ टिकते आणि त्यामुळे कमी आचेवरही छान स्वयंपाक होतो.
-
मातीच्या भांड्यांत स्वयंपाक केल्याने अन्नामध्ये विशिष्ट असा मातीचा सुगंध उतरतो. हे भांडे अन्नाची आम्लता आणि क्षारता संतुलित ठेवते. त्यामुळे अन्नाचे चवीसह पोषण वाढते.
-
मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना अन्नातील पोषक घटक नष्ट होत नाहीत. तसेच त्यामध्ये अन्न सर्व बाजूंनी समान शिजते आणि ते अधिक वेळ गरम राहते.
-
मातीची भांडी दुकानातून घेतल्यावर ती घरी वापरण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे तयारी करावी लागते. त्यामुळे भांडी चांगली टिकतात आणि स्वच्छ राहतात.
-
मातीचे नवीन भांडे घरी आणल्यावर त्याकरिता साबण न वापरता, त्या भांड्यात पाणी भरून, ते ८ ते १४ तास भिजवावे. त्यामुळे माती चांगल्या रीतीने पाणी शोषून घेते आणि उष्णता कमी करते. मग ती भांडी अधिक टिकाऊ होतात.
मातीच्या भांड्यात शिजवलेल्या भाज्या खाल्ल्या आहेत का? जाणून घ्या त्यांचे आरोग्यदायी फायदे….
मातीची भांडी नैसर्गिक चव देणारी आणि आरोग्यदायी असतात.
Web Title: Benefits of cooking in clay pots natural healthy flavor nutrient retention simple care health tips svk 05