-
Black Fungus on Onions: कांद्यावर दिसणारे काळे डाग किंवा काजळीसारखा थर ही एक प्रकारची बुरशी असते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
या बुरशीचे शास्त्रीय नाव एस्परजिलस नायजर (Aspergillus Niger) आहे.
-
ही बुरशी विषारी असू शकते. ती खाल्ल्यास डोकेदुखी, उलट्या, मळमळ (मळमळ होणे), पोटदुखी किंवा अतिसार (जुलाब) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
-
काही संशोधनात असे आढळले आहे की ही बुरशी एक प्रकारचे विष (Toxin) सोडते, ज्यामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकते.
-
विशेषतः दम्याचा (Asthma) त्रास आहे, अशा लोकांसाठी ही बुरशी हानिकारक ठरू शकते. यामुळे ऍलर्जीची लक्षणे वाढू शकतात.
-
जर बुरशी फक्त कांद्याच्या बाहेरच्या सालीवर किंवा एका-दोन थरांवर असेल, तर तो काळा भाग कापून किंवा काढून टाकून आतील चांगला कांदा वापरता येतो.
-
पण जर कांदा आतपर्यंत खराब झाला असेल आणि त्याला काळी बुरशी लागली असेल, तर तो कांदा खाऊ नये.
-
कांदा साठवताना तो चांगला सुकवून आणि योग्य तापमानात ठेवावा.
-
(हेही पाहा : दसऱ्याला सोने खरेदी केल्याने काय होते? ‘घरात धन-धान्य…’)
तुम्हीदेखील काळी बुरशी असलेला कांदा वापरता का? यामुळे शरीराला होऊ शकते हानी
काही संशोधनात असे आढळले आहे की ही बुरशी एक प्रकारचे विष सोडते.
Web Title: If you consume black fungus contaminated onions these health issues will happen sdn