• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. yoga for insomnia improve sleep cycle naturally with simple habits health tips svk

Photos : झोप न लागण्याच्या त्रासावर उपाय! योग आणि काही सोप्या सवयींनी मिळवा शांत झोप

झोप न लागण्याची समस्या म्हणजेच निद्रानाश आता अनेकांना भेडसावणारी गंभीर अडचण बनली आहे.

October 9, 2025 13:29 IST
Follow Us
  • Insomnia
    1/9

    योगासनांनी वाढवा झोपेची गुणवत्ता तणाव, चिंता आणि मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी योग अतिशय प्रभावी आहे. चंद्र भेदन प्राणायाम हा श्वसनाभ्यास शरीर शांत करून झोप येण्यास मदत करतो. रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे हा प्राणायाम केल्यास मन शांत होते.

  • 2/9

    चंद्र भेदन प्राणायाम (Chandra Bhedana Pranayama) उजव्या नाकाने श्वास घेताना आणि डाव्या नाकाने श्वास सोडताना श्वासांची संख्या समान ठेवावी. हे क्रिया पारासिंपॅथेटिक तंत्रिका संस्थेला सक्रिय करते आणि मन व शरीर अशा दोहोंनाही शांत करते, ज्यामुळे निद्रा सुधारते.

  • 3/9

    ‘सुप्त भद्रासन’
    शरीराला देते विश्रांती पाठीवर झोपून पायांच्या तळव्यांचा स्पर्श करून हे आसन केल्याने स्नायू शिथिल होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. झोपण्याआधी हे आसन केल्याने तणाव कमी होतो आणि निद्रा सहज येते.

  • 4/9

    ‘विपरीत करणी मुद्रा’ झोपेसाठी उपयुक्त पाय वर करून या मुद्रेत काही मिनिटे राहिल्याने मेंदूकडे रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे शरीरातील थकवा कमी होतो आणि मन शांत होते, ज्यामुळे झोप नैसर्गिकरीत्या लागते.

  • 5/9

    मोबाईलचा वापर कमी करा तज्ज्ञ सांगतात की, झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी केल्यास झोपेवर चांगला परिणाम होतो. शक्य असल्यास फोन दूर ठेवा किंवा एअरप्लेन मोड वापरा.

  • 6/9

    झोपेसाठी शांत आणि अंधारमय वातावरण ठेवा
    खोलीतील प्रकाश कमी ठेवावा आणि आवाज टाळावा. अंधार व शांत वातावरणात शरीरातील मेलाटोनिनचे प्रमाण वाढते, जे झोपेसाठी आवश्यक आहे.

  • 7/9

    झोपण्याआधी उबदार दूध पिण्याची सवय लावा उबदार दूध शरीरातील सेरोटोनिन वाढवते, जे झोप आणण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे फायदेशीर मानले जाते.

  • 8/9

    कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवा झोपण्याच्या आधी कोमट पाण्यात पाय काही मिनिटं बुडवून ठेवल्यास शरीरातील ताण कमी होतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि झोप पटकन लागते.

  • 9/9

    तज्ज्ञांचा सल्ला : या सर्व उपायांचा सातत्याने अवलंब केल्यास एका महिन्यात झोपेचा दर्जा सुधारू शकतो. मात्र, झोपेच्या समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो सौजन्य: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Yoga for insomnia improve sleep cycle naturally with simple habits health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.