-

आजकाल पाठदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. तासंतास एकाच जागी बसून काम करणे , व्यायमाची कमतरता, चुकीचे पॉश्चर आणि ताण अशा अनेक गोष्टींमुळे कंबरदुखीचा त्रास वाढतो. पण बऱ्याचदा शरीरात काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळेही हा त्रास होऊ शकतो. (Photo Source: Pexels)
-
जर शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळाली नाहीत तर हाडे कमकुवत होऊ लागतात आणि स्नायू दुखू लागतात किंवा आकडू लागतात. आज आपण कोण-कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे पाठदुखी कमी होऊ शकते आणि तो थांबवण्यासाठी कशाचे सेवन केले पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. (Photo Source: Pexels)
-
व्हिटॅमिन डी ला सनशाईन व्हिटॅमिन म्हटले जाते कारण त्याचा सर्वोत्तम स्रोत सूर्यप्रकाश आहे. ते हाडे मजबूत करते आणि शरीरात कॅल्शियमची पातळी राखून ठेवते. जर तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला हाडे दुखणे, पाठ आकडून जाणे आणि थकवा यासारख्या समस्या येऊ शकतात. याची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज सकाळी १५-२० मिनिटे उन्हात बसा. सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल आणि सार्डिनसारखे माशांचे सेवन करा. तुमच्या आहारात दूध, दही, चीज आणि तूप यासारखे दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करा. (Photo Source: Pexels)
-
व्हिटॅमिन बी१२ नर्व्हस सिस्टम निरोगी ठेवते आणि लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. याच्या कमतरतेमुळे नसांमध्ये सूज येणे आणि कंबर किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात. व्हिटॅमिन बी१२ चे प्रमुख स्रोत हा अंडी, मासे यासारखे मांसाहारी पदार्थ. शाकाहारींसाठी फोर्टिफाइड पदार्थ (जसे की फोर्टिफाइड दूध, कडधान्य आणि सोया प्रॉडक्ट्स). नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन बी१२ ने समृद्ध असलेले मशरूम तुमच्या नाश्त्यात किंवा रात्रीच्या जेवणात घेतले जाऊ शकतात. (Photo Source: Pexels)
-
व्हिटॅमिन सी हे शरीरातील टिश्यू रिपेयर करण्यास आणि कोलेजन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे हाडे, स्नायू आणि लिगामेंट्स मजबूत होतात. याच्या कमतरतेमुळे सूज, स्नायूंवर तणाव आणि वेदना होऊ शकतात. व्हिटॅमिन सीचे प्रमुख स्रोत म्हणजे आवळा, संत्री, लिंबू, पेरू, किवी, स्ट्रॉबेरी, हिरव्या पालेभाज्या आणि टोमॅटो हे आहेत. (Photo Source: Pexels)
-
व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. आणि यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळू शकतो. व्हिटॅमिन ईचे प्रमुख स्रोत म्हणजे बदाम, सूर्यफूल बिया, शेंगदाणे, पालक आणि एवोकॅडो इत्यादी आहेत. (Photo Source: Pexels)
-
सर्व जीवनसत्त्वे असलेला संतुलित आहार घ्या, नियमितपणे हलका व्यायाम करा, उन्हात थोडा वेळ घालवा आणि जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे टाळा. (Photo Source: Pexels)
-
जर कंबरदुखी कायम असेल आणि खूप जास्त असेल तर याला हलक्यात घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की याचे कारण जीवनसत्त्वांची कमी आहे की इतर काही मेडिकल समस्या आहे. (Photo Source: Pexels)
कंबरदुखीने त्रस्त आहात? ‘या’ जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते कारण! वाचा बचावाचे सोपे उपाय
जर तुम्हाला वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल, तर कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या वाढू शकते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तुमच्या हाडे आणि स्नायूंसाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांबद्दल जाणून घेऊयात…
Web Title: Deficiency of these vitamins can cause back pain know how to curb this marathi news rak