-

‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तानुसार २०२१ च्या एका अभ्यासानुसार, अंडी २५°C तापमानावर काही दिवस ठेवली असता, सॅल्मोनेला टायफिम्युरियम या जंतूंची वाढ झपाट्याने होते; पण तीच अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली, तर त्यांची वाढ खूप कमी होते.
-
अमेरिकेसारख्या देशांत अंडी विक्रीपूर्वी धुतली आणि निर्जंतुक केली जातात. त्यामुळे त्यांचे नैसर्गिक संरक्षक थर निघून जातात. म्हणूनच तिथे अंडी थंड जागी ठेवणे आवश्यक असते.
-
USDA (अमेरिकेचा कृषी विभाग) सुचवतो की, अंडी ४°C किंवा त्याखालील तापमानावर ठेवावीत आणि फ्रिजमधून बाहेर काढल्यावर दोन तासांपेक्षा जास्त वेळ खोलीच्या तापमानात ठेवू नयेत.
-
युरोप आणि आशियातील अनेक देशांत अंडी धुतली जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या कवचावरील नैसर्गिक थर (cuticle) टिकून राहतो आणि त्यामुळे तिथे अंडी थंड जागी ठेवण्याची तितकीशी आवश्यकता नसते.
-
भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशांत उष्ण तापमानामुळे अंडी लवकर खराब होऊ शकतात. म्हणून रेफ्रिजरेशन केल्यास ती जास्त काळ ताजी आणि सुरक्षित राहतात.
-
फ्रिजमधून वारंवार अंडी बाहेर काढल्यास, त्यावर ओलसरपणा (condensation) तयार होतो आणि या ओलसर थरात जंतू वाढण्याची शक्यता वाढते.
-
जर तुम्ही सुपर मार्केटमधून घेतलेली अंडी आधीच थंड जागी ठेवलेली असतील, तर ती पुढेही फ्रिजमध्येच ठेवा. अंडी मूळ कार्टनमध्ये ठेवावीत आणि फ्रिजच्या दरवाजात न ठेवता, आतील शेल्फवर ठेवावीत. कारण- दरवाजा उघडताना तापमान बदलत राहते.
-
स्थानिक शेतीतून आलेली न धुतलेली अंडी हवामान थंड असेल तर काही दिवस खोलीच्या तापमानावरही ठेवता येतात साधारण एक आठवड्यापर्यंत ती ताजी राहतात.
-
लोकप्रिय समजुतीप्रमाणे, अंडी थंड जागी ठेवल्याने त्यांची चव किंवा पौष्टिकता कमी होत नाही. उलट, रेफ्रिजरेशनमुळे अंड्यांचा ताजेपणा आणि सुरक्षितता जास्त काळ टिकून राहते. (टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक/पेक्सल्स )
अंडी फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय चुकीची तर नाही ना? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत…
अंड्यांचा ताजेपणा, जंतूंपासून बचाव आणि दीर्घकाळ सुरक्षितता -रेफ्रिजरेशन खरंच आवश्यक आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात आणि विविध देशांतील सवयींमधील फरक.
Web Title: Should you keep eggs in refrigerator or not know expert opinion on storage habit svk 05