• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. only one fig a day can give your body these 7 amazing health benefits tips svk

दररोज फक्त एक अंजीर खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ ७ जबरदस्त फायदे

Figs Benefits: अंजीर म्हणजे आरोग्याचा खजिना! पचन, हृदय, हाडे आणि त्वचेसाठी रोज एक अंजीर खाण्याची सवय ठेवा आणि अनुभवा आश्चर्यकारक बदल.

Updated: October 31, 2025 11:32 IST
Follow Us
  • Figs benefits
    1/9

    फक्त एक अंजीर रोज खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा, त्वचा, हृदय आणि हाडांचे आरोग्य एकाच वेळी सुधारते. ही सवय रोजच्या आहारात सहज अंगीकारता येते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 2/9

    अंजीर पचन सुधारते दररोज एक अंजीर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यात भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तावर नियंत्रण राहते. रात्री भिजवलेला अंजीर सकाळी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 3/9

    हृदयाचे आरोग्य सुधारते अंजीरमधील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील ट्रायग्लिसराइड कमी करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. तसेच पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/9

    रक्तातील साखर नियंत्रित ठेवते गोड असूनही अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यातील फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 5/9

    हाडे मजबूत बनवते अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. ही खनिजे हाडांची ताकद वाढवतात आणि वय वाढल्यावरही हाडे मजबूत ठेवतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 6/9

    त्वचेला चमक आणते दररोज एक अंजीर खाल्ल्याने त्वचेचा ग्लो वाढतो. अंजीरमधील व्हिटॅमिन A, E आणि K त्वचेला पोषण देतात आणि एक्झिमा, सोरायसिससारख्या समस्या कमी करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 7/9

    रोगप्रतिकारशक्ती वाढवते अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि झिंक असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात; त्यामुळे संसर्गांपासून संरक्षण मिळते आणि शरीर तंदुरुस्त राहते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 8/9

    वजन नियंत्रणात ठेवते अंजीरमधील फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहते. हे आरोग्यदायी, नैसर्गिक गोड स्नॅक म्हणून उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 9/9

    (टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Only one fig a day can give your body these 7 amazing health benefits tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.