-

“दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून लांब राहा” ही ओळ आपण सगळ्यांनी ऐकली आहे. सफरचंद हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ मानले जाते; कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, फायबर आणि खनिजे असतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पण तुम्हाला माहिती आहे का, बाजारात आता बनावट आणि केमिकलने पिकवलेली सफरचंद विकली जात आहेत? अशी सफरचंद आरोग्याला फायदा न होता उलट नुकसान करतात. त्यातील रसायने शरीरासाठी हानिकारक असतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
जर तुम्हालाही वाटत असेल की चमकदार आणि लाल सफरचंदच सर्वोत्तम असतात, तर हे वाचा! इथे काही सोप्या ट्रिक्स दिल्या आहेत, ज्यांनी तुम्ही ओळखू शकता की सफरचंद खरे आहे की बनावट. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
सफरचंदाची चमक आणि रंग तपासा सफरचंद घेताना त्याच्या शाईनकडे लक्ष द्या. जर ते खूपच चमकदार आणि गुळगुळीत दिसत असेल, तर त्यावर वैक्स किंवा केमिकल कोटिंग केलेले असू शकते. नैसर्गिक सफरचंद फार चमकदार नसतात. खरी सफरचंदे हलक्या लालसर किंवा हिरवट टोनमध्ये असतात, तर बनावट सफरचंदे गडद आणि एकदम ‘परफेक्ट’ दिसतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
सुगंधावरून ओळखा सफरचंद खरेदी करताना त्याचा सुगंध घ्या. जर गोड आणि ताज्या वासाची अनुभूती आली तर ते नैसर्गिक आहे. पण, जर वास विचित्र किंवा केमिकलसारखा वाटला, तर ते बनावट असण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
सालीवरून रंग किंवा मोम तपासा बनावट सफरचंदांवर वैक्स किंवा रंग लावला जातो, जेणेकरून ती जास्त फ्रेश दिसतील. हे ओळखणे सोपे आहे सफरचंद कपड्याने घासून पाहा. जर रंग किंवा चिकटपणा निघाला, तर ते बनावट आहे. खरे सफरचंद सालीवरून रंग किंवा मोम सोडत नाहीत. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
पाण्याची चाचणी करा एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात सफरचंद टाका. जर ते पाण्यावर तरंगले तर ते नैसर्गिक आहे, पण जर ते पाण्यात बुडाले तर ते केमिकलने पिकवलेले असू शकते; कारण त्यात रासायनिक पदार्थ आणि वैक्स जास्त असतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
स्टिकर पाहून फसू नका कधी कधी लोक स्टिकर पाहून सफरचंद इम्पोर्टेड किंवा खरे मानतात. पण, आता अनेक विक्रेते स्वतःच बनावट स्टिकर लावतात, त्यामुळे फक्त स्टिकर पाहून विश्वास ठेवू नका, तर वर सांगितलेल्या सगळ्या चाचण्या जरूर करा. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
खऱ्या सफरचंदाची ओळख का गरजेची आहे? बनावट किंवा केमिकलने पिकवलेली सफरचंद आरोग्यासाठी घातक असतात. त्यातील रसायनांमुळे यकृत, मूत्रपिंड आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. दीर्घकाळ अशी सफरचंद खाल्ल्याने शरीरात विषारी घटक साचतात आणि आरोग्य बिघडू शकते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
तुम्ही बनावट सफरचंद तर खात नाही ना? केमिकलने पिकवलेली फळे ओळखण्याच्या ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स
Identify Real vs Artificial Apples: बाजारात केमिकलने पिकवलेली सफरचंद विक्रीस; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स, ज्यानी तुम्ही ओळखू शकता असली आणि नकली सफरचंदातला फरक
Web Title: How to identify fake and chemical coated apples before buying them for daily eating svk 05