-   भारतीय रेल्वे कात टाकणार असून, प्रवासी सुविधेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या नव्या डब्यांचे मंगळवारी अनावरण करण्यात आले. आकर्षक रंगसंगती आणि उठावदार डिझाईनसह नव्या डब्यांत फायर सेफ्टी उपाययोजनेवरही भर देण्यात आला आहे. (छाया- ताशी तोबग्याल) 
-  प्रवाशांना अद्ययावत सुविधा देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचे हे पहिले पाऊल असणार असल्याचे यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले. (एक्स्प्रेस फोटो) 
-  एलईडी लाईट्स, एक्झॉस्ट फॅनसह प्रवाशांना सोबत आणलेले खाद्यपदार्थ ठेवण्यासाठीचा छोटेखानी टेबल अशा विविध सुविधा नव्या डब्यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
-  रेल्वेच्या नव्या रेल्वे डब्यांतील शौचालये आकाराने मोठी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. 
-  स्लिपर डब्ब्यातील आसन व्यवस्था आकर्षक आणि आरामदायी करण्यावर भर देण्यात आला आहे. 
-  रेल्वे प्रशासाने ३१ कोटी खर्चून हे सोयी-सुविधांनी सज्ज असलेले १११ नवे डबे तयार केले असून पुढील काही काळात आणखी डबे तयार करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. 
-  एसी-१ वर्गवारीतील रेल्वे डबा तयार करण्यासाठी प्रत्येकी २५ लाखांचा खर्च आल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य हेमंत कुमार यांनी दिली. 
-  दरम्यान, हे नवे डबे नेमक्या कोणत्या रेल्वे-मार्गावर दाखल करायचे हे अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचेही हेमंत कुमार म्हणाले. 
-  नव्या डब्यांतील स्वच्छतागृहात शॉवरचीही सुविधा देण्यात आली आहे. 
-  एसी वर्गवारीतील डब्यांचीही रचना आकर्षक करण्यात आली आहे. 
-  रेल्वेच्या नव्या डब्यांची आकर्षक रचना 
-  एसी वर्गवारीतील डब्यांच्या आतील रचना. (एक्स्प्रेस फोटो) 
-  एक्झॉस्ट फॅन, एलईडी दिवे आणि स्कॅन्स टेबलची नव्या डब्यांत सुविधा. (एक्स्प्रेस फोटो) 
-  स्लिपर डब्यांतील आकर्षक रंगसंगती. (एक्स्प्रेस फोटो) 
-  नव्या सोयी-सुविधांनी सज्ज असलेले हे डबे लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. (एक्स्प्रेस फोटो) 
-  रेल्वेचे अद्ययावत किचन. (एक्स्प्रेस फोटो) 
होय, ही भारतीय रेल्वे आहे…
Web Title: Yes this is the new indian railways compartment