• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. these indian origin ceos ruling the technology industry scsg

कौतुकास्पद! तंत्रज्ञान श्रेत्रातील या सहा दिग्गज कंपन्यांची धुरा भारतीयांच्या हाती

जाणून घ्या जगभरातील तंत्रज्ञान श्रेत्रातील कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांबद्दल

January 31, 2020 15:31 IST
Follow Us
  • जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद यांच्या नियुक्तीबरोबरच त्यांचा समावेश माहिती तंत्रज्ञान श्रेत्रामधील कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांमध्ये झाला आहे. आजच्या घडीला जगभरातील पाच अव्वल कंपन्यांचे नेतृत्व भारतीयांच्या हाती आहे. जाणून घेऊयात याच पाच सीईओंबद्दल...
    1/13

    जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद यांच्या नियुक्तीबरोबरच त्यांचा समावेश माहिती तंत्रज्ञान श्रेत्रामधील कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांमध्ये झाला आहे. आजच्या घडीला जगभरातील पाच अव्वल कंपन्यांचे नेतृत्व भारतीयांच्या हाती आहे. जाणून घेऊयात याच पाच सीईओंबद्दल…

  • 2/13

    अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद कृष्णा सहा एप्रिल रोजी आयबीएमच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भात आयबीएमनेच पत्रक जारी करुन माहिती दिली आहे. ६२ वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ४० वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या २०२० च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

  • 3/13

    ५७ वर्षीय अरविंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद हे सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात. आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत. त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्याआधी १९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते. आयआयटी कानपूरमधून अरविंद यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इलिनॉयमधील उर्बाना चॅम्पियन विद्यापिठातून इलेक्ट्रीक इंजिनियरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.

  • 4/13

    गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे सुंदर पिचाई भारतीय आहेत. नुकतीच त्यांची गुगलची मुख्य मातृकंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. ४७ वर्षीय पिचाई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. आयआयटी खरगपूरमधून त्यांचे अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळख असलेले पिचाई, २००४ पासून गुगलमध्ये कार्यरत आहेत.

  • 5/13

    गुगलचा क्रोम ब्राऊझर तयार करण्यामागे पिचाई यांचा मोलाचा वाटा आहे. २००८ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली गुगल क्रोम ही नवी प्रणाली स्थापन करण्यात आली. क्रोमच्या यशानंतर जीमेल अ‍ॅपचेही काम पिचई यांच्याकडे आले. २००८ नंतर पिचाई अँड्रॉइडचे प्रमुख झाले. अँड्रॉइड ही गुगलची मोबाइल फोन संचालन प्रणाली आहे. पिचाई यांनी २०१६-१७ च्या आर्थिक वर्षामध्ये वर्षी वेतन आणि अन्य रक्कम मिळून तब्बल २०० मिलियन डॉलर (१२.८५ अब्ज रुपये) इतके वेतन मिळाले आहे. सुंदर पिचाई जगातील सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती बनले आहेत. ते प्रतिमहिना सरासरी १ अब्ज वेतन घेतात. पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी सोपवल्यापासून प्रमुख जाहिराती आणि यूट्युबच्या माध्यमातून गुगलच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली. तसेच कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही मोठी गुंतवणूक केली.

  • 6/13

    २०१४ साली सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) सत्या नाडेला यांची निवड करण्यात आली. नाडेला यांनी स्टीव्ह बॉलमर यांची जागा घेत मायक्रोसॉफ्टचे नेतृत्व हाती घेतले.. जगातील प्रतिष्ठित कंपनी समजल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदाच्या या शर्यतीत नाडेला यांच्यासोबत गुगल क्रोम व अ‍ॅपचे प्रमुख सुंदर पिचाई (४२) यांचे नावही घेतले जात होते. नाडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ३९ वर्षांच्या इतिहासातील केवळ तिसरे सीईओ आहेत. याआधी कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि बॉलमर यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. बिल गेट्स हे आता तंत्रज्ञान सल्लागार म्हणून काम करतात.

  • 7/13

    सत्या नाडेला यांचा जन्म १९६९ मध्ये हैदराबाद येथे झाला, त्यांचे शालेय शिक्षण तेथेच हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले. मणिपाल तंत्रज्ञान संस्थेतून त्यांनी इलेक्ट्रॉनिक व संदेशवहन अभियांत्रिकीत पदवी घेतली व नंतरचे अभियांत्रिकी शिक्षण परदेशात घेतले. विस्कॉन्सिन विद्यापीठातून त्यांनी संगणक विज्ञानात स्नातकोत्तर पदवी घेतली. शिकागो विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. १९९२ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये आले. तेथे ते विंडोज डेव्हलपमेंट रिलेशन्स ग्रुपमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर झाले. नंतर ते वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन व विकास) या पदावर आले. सध्या ते मायक्रोसॉफ्ट वर्ड व क्लाऊड अँड एंटरप्राइजेसचे कार्यकारी उपाध्यक्ष बनले. क्लाउड विभागात त्यांनी केलेले काम पाहून त्यांना ‘क्लाऊड गाय’ असेही म्हटले जाते.

  • 8/13

    शंतनू नारायण हे जगप्रसिद्ध अॅडॉब कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शंतनू हे मूळचे हैदराबादचे आहेत. १९९८ पासून ते अॅडॉबमध्ये कार्यरत आहेत. २००७ साली त्यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. त्याआधी २००५ साली ते मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) पदी कार्यरत होते.

  • 9/13

    शंतनू यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ओहिओ येथील बॉवलिंग ग्रीन स्टेट विद्यापिठातून कंप्युटर सायन्समध्ये मास्टर्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

  • 10/13

    जयश्री उलाल या क्लाऊड नेटवर्किंग श्रेत्रात काम करणाऱ्या अॅरिस्ता नेटवर्क्स कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २००८ पासून जयश्री या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. जयश्री यांचा जन्म लंडनमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण दिल्लीमध्ये गेले.

  • 11/13

    जयश्री यांनी सॅनफ्रान्सिस्को स्टेट विद्यापिठामधून इलेक्ट्रीक इंजिनियरिंगचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी त्याच विद्यापिठातून इंजिनियरिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स पदवी संपादन केली.

  • 12/13

    राजीव सुरी मुळचे दिल्लीचे असणारे राजीव हे जगप्रसिद्ध नोकीया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १९९५ पासून ते नोकीयामध्ये कार्यरत आहेत. २०१५ पासून ते कंपनीमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात. नोकीया कंपनी २०१५ साली मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेल्यापासून ते या पदावर आहेत

  • 13/13

    मणीपाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यांनी बॅचलर्स ऑफ इंजिनियरिंगचे (इंजिनियरिंग अॅण्ड कम्युनिकेशन) शिक्षण पूर्ण केले आहे. प्रोडक्ट, मार्केटींग, सेल्स, अकाऊंट्स अशा सर्वच श्रेत्रांचा ५२ वर्षीय राजीव यांना दांडगा अनुभव आहे.

Web Title: These indian origin ceos ruling the technology industry scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.