Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. coronavirus raosaheb danve cooking food during quarantine photo goes viral scsg

काय शिजतयं?… ‘होम मिनिस्टर’बरोबर ‘दानवे दाजीं’चा फोटो झाला व्हायरल

जाणून घ्या या व्हायरल फोटोमागील गोष्ट

April 22, 2020 15:27 IST
Follow Us
  • लॉकडाउनमुळे देशभरातील व्यवहार ठप्प आहेत. अशावेळेस अनेक नेते आपआपल्या मतदारसंघात नागरिकांना मदत करताना दिसत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही वेगवेगळ्या प्रकारे स्थानिकांना मदत करताना दिसत आहेत. यासंदर्भातील अनेक पोस्ट ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट करत असतात. मात्र त्याचबरोबर आता त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केला आहे. या फोटोमध्ये रावसाहेब दानवे चक्क स्वयंपाक करताना दिसत आहेत.
    1/12

    लॉकडाउनमुळे देशभरातील व्यवहार ठप्प आहेत. अशावेळेस अनेक नेते आपआपल्या मतदारसंघात नागरिकांना मदत करताना दिसत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही वेगवेगळ्या प्रकारे स्थानिकांना मदत करताना दिसत आहेत. यासंदर्भातील अनेक पोस्ट ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट करत असतात. मात्र त्याचबरोबर आता त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केला आहे. या फोटोमध्ये रावसाहेब दानवे चक्क स्वयंपाक करताना दिसत आहेत.

  • 2/12

    करोना संसर्ग टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच स्वस्त धान्याच्या पुरवठ्याचा सोयगाव येथे दानवे यांनी १५ एप्रिल रोजी घेतलेली आढावा बैठक. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 3/12

    “सातत्याने २४ तास जनतेची सेवा करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक..! महसूल, पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधवांना अंबड येथे मास्कचे वाटप करण्यात आले”, या कॅप्शनसहीत दानवेंनी फेसबुवर २० एप्रिल रोजी शेअर केलेला हा फोटो. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 4/12

    भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर येथे धान्य व इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप करताना रावसाहेब दानवे. “करोना व्हायरसचा लढा आपण सर्वजण लढतो आहोत. देशपातळीवरच काय जगातील सर्वांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. यात गोर-गरीब, हातावर पोट असलेले, निराधार व्यक्ती जास्तच होरपळले जात आहेत. यांना आज मदतीची गरज भासत आहे. त्यांना भूक भागविण्यासाठी अन्नधान्याची आवश्यकता आहे आणि खरेतर हीच वेळ आहे खरी माणुसकी दाखविण्याची.एरवी आपण गावोगावी विविध सप्ताह,धार्मिक कार्यक्रम, विधी यांच्या निमित्ताने अन्नदान करत असतो.या अडचणीच्या काळात सुद्धा आपणास पुण्य करण्याची संधी आहे,” असं आवाहन दानवे यांनी हा फोटो शेअर करताना केलं आहे. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 5/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी तोंडावर गमछा बांधलेला फोटो आपला डीपी ठेवल्यानंतर १८ एप्रिल रोजी रावसाहेब दानवे यांनाही आपला सोशल नेटवर्किंगवरील डीपी बदलला. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 6/12

    करोनाच्या पार्श्वभूमीवर दानवेही वर्क फ्रॉम होम करतानाही दिसत आहेत. हा फोटो त्यांनीच आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र अनारोग्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे अनिवार्य आहे. त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा आणि समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करीत आहोत,” असं हा फोटो शेअर करताना दानवेंनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 7/12

    करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि इतर आरोग्यविषयक प्रश्नांबाबत बदनापूर तहसील कार्यालय येथील बैठकीला रावसाहेब दानवे उपस्थित होते. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 8/12

    सिल्लोड येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात दानवे यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि त्यासंबंधी सर्व व्यवस्थांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 9/12

    पीएम केअर्स फंडासाठी निधी देण्याचे आवाहन करताना रावसाहेब दानवे. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 10/12

    अनेकांनी दानवेंना भेटून पीएम केअर्ससाठी मदतनिधीचे धनादेश दिले. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 11/12

    धनादेश देणाऱ्यांचे फोटो दानवेंनी सोशल नेटवर्किंगवर शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. (फोटो सौजन्य: facebook /ravsahebdanvepatil)

  • 12/12

    दरम्यान या सर्व फोटोमध्ये मागील काही दोन दिवसांपासून दानवेचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकजण शेफ झाले आहेत. घरी बसून काय करायचं असं म्हणत अनेकांनी किचनचा मार्ग निवडला आहे. लॉकडाउनदरम्यान स्वयंपाक करण्याच मोह अगदी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही आवरला नाही. त्यांनाही रविवारी रात्री आपल्या जवखेडा गावातील शेतावर चुलीवर पिठलं तयार केलं. त्यांची पत्नी निर्माला दानवे यांनी बाजरीच्या भाकरी तयार केल्या. मी सर्वच शाकाहारी पदार्थ आवडीने खातो मात्र पिठलं-भाकरी ही आपली फेव्हरेट डीश आहे असं दानवे म्हणाल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. रावसाहेब दानवे यांचा सोशल नेटवर्किंगवर अनेकजण प्रेमाने दाजी असा उल्लेख करतात. तर नेटकऱ्यांनी आता त्यांच्या लाडक्या दानवे दाजींचा हाच फोटो व्हायरल केला असून त्यांच्या साधेपणाला सलाम केला आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus raosaheb danve cooking food during quarantine photo goes viral scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.