Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. british petroleum reliance to retail fuel under jio bp brand joint venture 1 billion dollar investment jud

ब्रिटनच्या ‘या’ कंपनीनं केली रिलायन्समध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; नवा संयुक्त उपक्रम सुरू करणार

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांना अनेक आघाड्यांवर यश मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती. तसंच नियोजित वेळेपूर्वीच त्यांना रिलायन्सला कर्जमुक्त करण्यात यश मिळालं होतं. (सर्व फोटो - संग्रहित)
    1/10

    गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांना अनेक आघाड्यांवर यश मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती. तसंच नियोजित वेळेपूर्वीच त्यांना रिलायन्सला कर्जमुक्त करण्यात यश मिळालं होतं. (सर्व फोटो – संग्रहित)

  • 2/10

    त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटीश पेट्रोलियम (बीपी) यांनी गुरुवारी रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडचा (आरबीएमएल) नवा भारतीय इंधन आणि मोबिलिटी संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली.

  • 3/10

    ब्रिटनमधील ब्रिटीश पेट्रोलियम या कंपनीनं रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे ब्रिटीश पेट्रोलियमनं मुकेश अंबानी यांच्या कंपनीतील ४९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

  • 4/10

    या कंपनीचा ५१ टक्के हिस्सा हा मुकेश अंबानी यांच्याकडेच राहणार आहे. गेल्या वर्षी दोन्ही कंपन्यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे नवी कंपनी सुरू करण्याच्या आपल्या योजनेची घोषणा केली होती.

  • 5/10

    बीपी आणि रिलायन्स यांच्या संयुक्त उपक्रमाचं नाव रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड असं असणार आहे.

  • 6/10

    ही कंपनी Jio-BP या ब्रँड अंतर्गत काम करणार आहे. या कंपनीला २१ राज्यांमधील आपलं अस्तित्व आणि जिओ डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरील लाखो ग्राहकांचा फायदाही मिळणार आहे.

  • 7/10

    पुढील ५ वर्षांमध्ये फ्लूअल रिटेलिंग नेटवर्क वाढवून ५ हजार ५०० फ्य़ूअल स्टेशन उभारणं हे रिलायन्स आणि ब्रिटीश पेट्रोलियम या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाचा उद्देश आहे.

  • 8/10

    सध्या देशात या कंपनीचे १ हजार ४०० फ्यूअल स्टेशन्स आहेत. फ्यूअल स्टेशन्स वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होऊन एकून ८० हजार जणांना रोजगार मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

  • 9/10

    या करारानुसार ब्रिटीश पेट्रोलियम आपल्या उच्च प्रतीच्या इंधनाचा, ल्युब्रिकंट, किरकोळ आणि प्रगत लो कार्बन मोबिलिटीचा वापर करणार आहे.

  • 10/10

    RBML ने आवश्यक नियामक व कायदेशीर मंजुरींसह परिवहन इंधनांसाठी विपणन अधिकार प्राप्त केले आहेत.

Web Title: British petroleum reliance to retail fuel under jio bp brand joint venture 1 billion dollar investment jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.