-
मागच्या अनेक महिन्यांपासून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची बरीच चर्चा सुरु आहे. ऑक्सफर्डने संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस विरोधात लस विकसित केली आहे.
-
ही लस मानवी चाचणीमध्ये कितपत परिणामकारक ठरली, ते आता समोर आले आहे. ऑक्सफर्डच्या संशोधकांच्या अपेक्षेप्रमाणे ही लस मानवी शरीरावर परिणामकारक ठरली आहे.
-
ही लस टोचल्यानंतर धोकादायक करोना व्हायरपासून दुहेरी संरक्षण मिळू शकते असे संशोधनातून समोर आले आहे. ही लस म्हणजे करोना विरोधात महत्त्वाचा शोध असल्याचे संशोधक मानत आहेत.
-
सुरुवातीच्या प्राथमिक टप्प्यातील मानवी चाचणीचे हे निष्कर्ष आहेत. यूकेमधल्या प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
-
लसीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज बरोबर किलर 'टी-सेल्स'ची निर्मिती झाल्याचे दिसून आले.
-
या संशोधनात सहभागी असलेल्या सूत्राच्या हवाल्याने 'द डेली टेलिग्राफ'ने हे वृत्त दिले आहे.
-
-
चाचणीतून समोर आलेल्या गोष्टी खूपच आशादायक आहेत. पण संशोधक सावध आहेत, कारण ऑक्सफर्डची लस दीर्घकाळासाठी व्हायरसपासून संरक्षण देईल हे अजून सिद्ध झालेले नाही.
-
ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर शरीरात अँटी बॉडीज आणि टी सेल्सची निर्मिती होते. हे कॉम्बिनेशन लोकांना सुरक्षित ठेवेल अशी अपेक्षा आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण अजूनही आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे असे सूत्रांनी सांगितले.
-
ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा सुरुवातीच्या टप्प्यातील मानवी चाचणीचा डाटा येत्या सोमवारी 'द लॅन्सेट' मेडीकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
-
ऑक्सफर्डच्या चाचण्यांना परवानगी देणारे बर्कशायर रिसर्च एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डेव्हीड कारपेंटर यांनी लस विकसित करणारी टीम योग्य मार्गावर असल्याचे सांगितले.
-
"कोणीही अंतिम तारीख सांगू शकत नाही. काही गोष्टी चुकू सुद्धा शकतात. पण मोठया फार्माकंपनी सोबत काम करत असताना लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. हेच आमचे लक्ष्य असून त्या दिशेने आम्ही काम करत आहोत" असे डेव्हीड कारपेंटर म्हणाले.
-
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इंस्टीट्यूटने ही लस विकसित केली आहे. यूके सरकारने त्यांना मदत केली असून अस्त्राझेनेका उत्पादनाची जबाबदारी संभाळणार आहे.
-
ऑक्सफर्डच्या लसीची आता फेज ३ ची चाचणी सुरु आहे. यामध्ये हजारो स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे.
-
ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पात पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था सहभागी आहे. सिरमकडून या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे यशस्वी ठरलेल्या अन्य लसींच्या तुलनेत ही लस भारतीयांना लवकर मिळू शकते.
आनंदाची बातमी: सप्टेंबरपर्यंत येऊ शकते ऑक्सफर्डची करोनावरील लस
Web Title: Oxford university covid 19 vaccine gives double protection hopes rise dmp