-

मागच्या आठवडयात रशियन वैज्ञानिकांनी करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस मानवी परीक्षणात यशस्वी ठरल्याचा दावा केला.
-
मात्र आता रशियातील श्रीमंत उद्योजक आणि राजकीय नेत्यांपर्यंत ही लस आधीच पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
-
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना करोनाची लागण होऊ नये, म्हणून एप्रिल महिन्यातच प्रायोगिक टप्प्यावर असताना या लसीचे डोस देण्यात आल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.
-
रशियातील लस संशोधनाशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
-
रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. १२ जुलैला रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील करोना लसीच्या चाचण्या यशस्वी ठरल्याचा दावा केला.
-
रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस तयार केली आहे.
-
रशियातील कंपन्यांच्या टॉपच्या अधिकाऱ्यांना यात अॅल्युमिनियम जायंट युनायटेड कंपनी रसलचे अधिकारी तसेच अब्जोपती उद्योगपती आणि सरकारी अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यातच व्हायरसपासून सुरक्षा देण्यासाठी म्हणून प्रायोगिक टप्प्यावर असलेल्या या लसीचे डोस देण्यात आले.
-
पुढच्या महिन्यापासून ही लस नागरीकांसाठी उपलब्ध होईल असे गेमली सेंटरचे संचालक अलेक्झांडर गिंटसबर्ग यांनी म्हटले आहे.
-
सप्टेंबरपासून खासगी कंपन्या या लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन सुरु करतील.
-
स्वयंसेवक कार्यक्रमातंर्गत रशियातील नामवंतांना लसीचे डोस देताना नियमांचे उल्लंघन झालेले नाही. हे कायदेशीर आहे. फक्त ती गुप्तता बाळगण्यात आली असे या संशोधनाशी संबंधित असलेल्यांनी सांगितले.
-
रशियात आतापर्यंत ७.७१ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत तिथे करोनामुळे १२ हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. मॉस्कोला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे.
-
रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.
-
सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे.
-
मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले.
-
सगळ्यांनाच करोनामुळे चिंता सतावत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यासह जगातील काही नेत्यांनी अगदी रोगापेक्षाही भयंकर इलाज सुचवले आहेत. या उपायांमुळे हे नेते सध्या चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
धक्कादायक! रशियात श्रीमंत उद्योगपती, राजकारण्यांना आधीच मिळाले करोना लसीचे डोस
Web Title: Russias business and political elite given early access to experimental covid 19 vaccine dmp