• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sudan ends 30 years of islamic law by separating religion state scsg

३० वर्षांचे इस्लामिक शासन संपुष्टात; ‘या’ देशात आता लोकशाही नांदणार

सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महत्वाच्या कारारांवर केल्या स्वाक्षऱ्या

September 8, 2020 08:59 IST
Follow Us
  • आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडे असणाऱ्या सुदानमधील सरकारने इस्लामिक शासन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार आता सुदानमध्ये धर्म आणि सरकारमधील संबंध संपुष्टात आणण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. म्हणजेत आता सुदानमध्ये सत्ताधारी हे कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नसणार. (Photo: REUTERS)
    1/

    आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडे असणाऱ्या सुदानमधील सरकारने इस्लामिक शासन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार आता सुदानमध्ये धर्म आणि सरकारमधील संबंध संपुष्टात आणण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. म्हणजेत आता सुदानमध्ये सत्ताधारी हे कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नसणार. (Photo: REUTERS)

  • 2/

    सुदानचे प्रधानमंत्री अब्दुल्ला हमदोक आणि सुदान पीपल्स लिब्रेशन मुव्हमेंट-नॉर्थ या विरोधी गटाचे नेते अब्दुल-अजीज अल हिलू यांनी यासंदर्भातील घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. (Photo: REUTERS)

  • 3/

    गुरुवारी इथियोपियाची राजधानी असणाऱ्या अदीस अबाबामध्ये नवीन धोरण स्वीकारुन इस्लामिक कायदे रद्द करत देश प्रजासत्ताक बनवण्याच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यासंदर्भातील वृत्त ब्लमुबर्गने दिलं आहे. (फोटो : Umit Bektas REUTERS)

  • 4/

    या घोषणापत्रामध्ये सुदान यापुढे प्रजासत्ताक देश असेल. त्यासाठी येथील सर्व नागरिकांना समान हक्क देण्यात येतील. तसेच येथील संविधान, धर्म यांचा एकमेकांशी काही संबंध नसणार. (फोटो : Mohamed Nureldin Abdallah Reuters)

  • 5/

    सरकारचा विरोध करणाऱ्या विरोधी गटांसोबत शांततेसंदर्भात चर्चा सुरु झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आत दोन्ही बाजूंची सहमती झाली. या निर्णयामुळे आता दार्फुर आणि सुदानमधील काही भागांमधून हद्दपार करण्यात आलेला हुकूमशाह उमर-अल बाशीरशी सरकारला पुन्हा लढावं लागणार नाहीय. (Photo: REUTERS)

  • 6/

    सुदान पीपल्स लिब्रेशन मुव्हमेंट-नॉर्थच्या दोन गटांपैकी एका गटाने धर्मनिरपेक्ष कार्यपद्धतीचा अवलंब न करणाऱ्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला आहे. मात्र मुख्य गटाने स्वाक्षऱ्या केल्याने सरकारसमोरील पेच काही प्रमाणात सुटला आहे. (फोटो : Mohamed Nureldin Abdallah Reuters)

  • 7/

    १९८९ मध्ये हुकूमशाह उमर-अल बाशीरने देशातील सत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर तेथे प्रचंड अशांतता निर्माण झाली होती. (Photo: REUTERS)

  • 8/

    बशीरची सत्ता असताना अलकायदा आणि कार्लोस यांचे सुदानमध्ये तळ होते. 

  • 9/

    अमेरिकेने १९९३ ला सुदानला दहशतवादाला पाठिंबा देणारा देशांच्या यादीत टाकलं होतं. (Photo: REUTERS)

  • 10/

    दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याच्या सत्ताधारी बाशीरच्या धोरणांमुळे अमेरिकेने २०१७ मध्ये सुदानवर कठोर निर्बंध लादले होते. आता हे निर्बंध उठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (फोटो : AP)

Web Title: Sudan ends 30 years of islamic law by separating religion state scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.