Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. brazil people comes out on beaches of rio de janeiro scsg

सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या देशात निर्बंध झुगारुन हजारो नागरिक समुद्रकिनाऱ्यांवर

राष्ट्राध्यक्षांविरोधात अनेक ठिकाणी करण्यात आली घोषणाबाजी

September 9, 2020 10:38 IST
Follow Us
  • जगातील सर्वाधिक करोनाबाधित असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असणाऱ्या ब्राझिलमध्ये रुग्ण संख्येचे रोज नवे विक्रम होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मागील अनेक आठवड्यांपासून लॉकडाउन असणाऱ्या ब्राझिलमधील लोकांनी आता रस्त्यावर उतरुन लॉकडाउनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी आता समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ( सर्व फोटो : AP (असोसिएट प्रेस) )
    1/

    जगातील सर्वाधिक करोनाबाधित असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असणाऱ्या ब्राझिलमध्ये रुग्ण संख्येचे रोज नवे विक्रम होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मागील अनेक आठवड्यांपासून लॉकडाउन असणाऱ्या ब्राझिलमधील लोकांनी आता रस्त्यावर उतरुन लॉकडाउनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी आता समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ( सर्व फोटो : AP (असोसिएट प्रेस) )

  • 2/

    रविवारी ब्राझिलमधील रिओ द जानेरिओमधील इपेनेमा समुद्रकिनाऱ्यावर स्थानिकांची मोठी गर्दी दिसून आली. विकेण्डला समुद्रकिनाऱ्यावर गर्दीने फुलल्याचे दिसले होते. करोना लॉकडाउनमुळे बराच काळापासून घरात अडकून पडलेल्या लोकांनी समुद्रकिनाऱ्यांवर धाव घेत वॉटर स्पोर्ट्स, पोहण्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळालं.

  • 3/

    ब्राझिलमध्ये आतापर्यंत करोनाचे ४१ लाख रुग्ण आढळून आले आहेत. देशामध्ये करोनामुळे १ लाख २६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मागील सहा महिन्यांपासून लॉकडाउन आणि इतर निर्बंध असल्याने लोकांनी आता निर्बंधांची चिंता न करता जनजीवन पूर्वव्रत करण्यासाठी स्वत:च घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र ब्राझिलमधील अनेक शहरांमध्ये दिसत आहे. 

  • 4/

    ब्राझिलच्या समुद्र किनाऱ्यांवर हजारोच्या संख्येने नागरिक दिसू लागले आहेत. अनेकजण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना किंवा मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 5/

    ब्राझिलमध्ये अनेक ठिकाणी करोना परिस्थिती हातळण्यात आलेल्या अपयशावर टीका होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने लोकं लोक रस्त्यावर उतरुन राष्ट्राध्यक्ष बाल्सोनारो यांच्याविरोधात घोषणा देताना दिसत आहेत. बोल्सोनारो गेट आउट म्हणजेच बोल्सोनारो निघून जा अशा घोषणा आंदोलनकर्ते देत आहेत. फोटोमध्ये दिसणारी माहिला आपल्या १२ वर्षीय मुलाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मोर्चात सहभागी झाली होती. मुलाचे रक्ताने माखलेले टी-शर्ट हवेत झळकावताना ही माहिला दिसत आहे.

Web Title: Brazil people comes out on beaches of rio de janeiro scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.