-
ठाणे रेल्वेस्थानकात सोमवारी हजारो स्थलांतरितांचे आगमन झाले. मात्र, यावेळी मनपाच्या नियोजनाच्या अभावामुळे अॅन्टिजेन तपासणी करून घेण्यासाठी या स्थलांतरितांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ( सर्व फोटो सौजन्य : दिपक जोशी )
-
ठाणे रेल्वेस्थानकात शिवाय मोठ्याप्रमाणावर गर्दी देखील झाली होती.
-
तपासणी करून घेण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास या स्थलांतरितांना रांगेत उभा राहवं लागत होतं. यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.
-
एवढ्यामोठ्या प्रमाणावर लोकं एकत्र असल्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता देखील अधिकच होती.
-
सोशलडिस्टंसिंगच्या नियामांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
-
काही नागरिकांच्या चेहऱ्यावर तर मास्क देखील नसल्याचे दिसून येत होते.
-
करोना लॉकडाउनमुळे कामधंदे ठप्प झाल्यानंतर हातचा रोजगार गमावलेले, शेकडो स्थलांतरित मजूर आपल्या गावी गेले होते.
-
आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर व उद्योग-व्यवसाय सुरू होऊ लागल्याने, शेकडो स्थलांतरित पुन्हा कामावर वापसी करण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.
स्थलांतरितांची काम वापसी…ठाणे रेल्वे स्थानकात हजारोंच्या संख्येने गर्दी
हजारो स्थलांतरित पुन्हा कामावर वापसी करण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.
Web Title: Hundreds of migrants arrived for back to work at thane railway station asy