• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. russia to consider indias request for speedy delivery of s 400 air defence systems dmp

…तर रशिया F-16, मिसाइल हवेतच नष्ट करणारी S-400 सिस्टिम जलदगतीने भारताला देईल

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • S-400 एअर डिफेन्स सिस्टिम जलदगतीने सुपूर्द करण्यासंदर्भात भारताने कोणतीही विनंती केल्यास, आम्ही आमच्यापरीने लवकरात लवकर ती सिस्टिम देण्याचा प्रयत्न करु, असे रशियाच्या मुत्सद्दी अधिकाऱ्याने सांगितले.
    1/10

    S-400 एअर डिफेन्स सिस्टिम जलदगतीने सुपूर्द करण्यासंदर्भात भारताने कोणतीही विनंती केल्यास, आम्ही आमच्यापरीने लवकरात लवकर ती सिस्टिम देण्याचा प्रयत्न करु, असे रशियाच्या मुत्सद्दी अधिकाऱ्याने सांगितले.

  • 2/10

    पुढच्यावर्षी २०२१ च्या अखेरीस ही एअर डिफेन्स सिस्टिम भारताकडे सुपूर्द करण्याची योजना आहे. दोन्ही देश केए-२२६ या बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सची खरेदीसंदर्भातील करार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियान लक्षात घेऊनच हे करार करण्यात येतील, असे रशियाचे मुत्सद्दी अधिकारी रोमन बाबुशकीन म्हणाले.

  • 3/10

    भारताने रशियाबरोबर ५.४ अब्ज डॉलर्सचा पाच S-400 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा करार केला आहे.

  • 4/10

    भारत-चीनमध्ये लडाख सीमेवर असलेल्या तणावामुळे S-400 एअर डिफेन्स सिस्टिम लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे काही संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

  • 5/10

    या सिस्टिमसाठी भारताने मागच्यावर्षी पेमेंटचा एक हप्ता दिला आहे. एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे.

  • 6/10

    शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल.

  • 7/10

    शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. रशियाने विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे.

  • 8/10

    जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अ‍ॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.

  • 9/10

    एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे.

  • 10/10

    युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.

Web Title: Russia to consider indias request for speedy delivery of s 400 air defence systems dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.