• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. corona vaccine immunisation emerge shots in batches of hundread people thirty minutes each dmp

तीन खोल्या, ३० मिनिटात लस अन्….; समजून घ्या भारताचा लसीकरणाचा संपूर्ण प्लान

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.
    1/15

    करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

  • 2/15

    सध्यातरी लस हाच या आजाराला रोखण्यााच एकमेव मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काल एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना आता लसीची जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही, असे सांगितले.

  • 3/15

    पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितलेली असताना आता भारत बायोटेकनेही स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीसाठी अशाच प्रकारची परवानगी मागितली आहे.

  • 4/15

    जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे. अमेरिकन कंपनी फायझरने सुद्धा आपातकालीन वापरासाठी अर्ज केला आहे.

  • 5/15

    आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा करोना लशीचा डोस देण्यात येईल. त्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्राकडून डाटा मागवण्यात आला आहे.

  • 6/15

    करोना लसी संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने अंतिम आराखडा तयार केला आहे.

  • 7/15

    राज्यांनी तज्ज्ञ समितीला जो डाटा दिलाय, त्यानुसार एक कोटी फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला लसीचा डोस मिळेल, इंडियन एक्स्प्रेसने आधीच हे वृत्त दिले होते.

  • 8/15

    प्रत्येक नागरिकाला लसीचा डोस देण्यासंदर्भात सरकारने मार्गदर्शकतत्वे आखली आहेत. सरकारी सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली आहे. मार्गदर्शकतत्त्वानुसार प्रत्येक लसीकरण केंद्रावर तीन स्वतंत्र खोल्या असतील.

  • 9/15

    ज्याला लसीचा डोस मिळणार आहे, तो पहिल्या रुममध्ये थांबेल. दुसऱ्या रुममध्ये प्रत्यक्ष लसीचा डोस दिला जाईल.

  • 10/15

    लसीचा डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला तिसऱ्या रुममध्ये तीस मिनिटं थांबावं लागेल. कारण काही प्रतिकुल परिणाम शरीरावर होतोय का? ते तिथं तपासलं जाईल.

  • 11/15

    प्रत्येक सेशनमध्ये लसीचे १०० डोस दिले जातील. एका व्यक्तीच्या लसीकरणाला ३० मिनिटे लागतील असे सूत्रांनी सांगितले

  • 12/15

    लसीकरणासाठी कोविन आयटी सिस्टिमचा वापर करण्यात येईल. राज्यांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचा जो डाटा मिळालाय तो सध्या कोविनच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचे काम सुरु आहे.

  • 13/15

    स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत तर डॉ. रेड्डी लॅबने रशियन लस स्पुटनिक व्ही चाचण्या सुरु केल्या आहेत.

  • 14/15

    यूके, बहरीन आणि अन्य देशात फायझरच्या लसीला आपातकालीन वापराची मान्यता मिळाली आहे. भारतातही त्यांनी अर्ज केला आहे. ही करोना प्रतिबंधक लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

  • 15/15

    फायझरची लस स्टोअर करणे एक मोठे आव्हान आहे. तशा प्रकारचे तापमान मेन्टेन करण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीयत.

Web Title: Corona vaccine immunisation emerge shots in batches of hundread people thirty minutes each dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.