-
टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी आपल्याविरोधातील खोट्या बातम्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळ परिसरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही महत्वाची विधानं केली. (सर्व फोटो – संग्रहित)
-
-
"ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे”
-
"ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अभिनेत्री कंगना रणौत यांनी माझ्याविरोधात खोटं ट्विट केलं. यामुळे कंगना रणौत तसंच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे.
-
"कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे,"
-
"गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. त्या चौकशीला सर्वतोपरी आम्ही सहकार्य करत आहोत. ज्यावेळी चौकशीची गरज असेल, शंका असतील त्या निरसन करण्यासाठी दोन तासात हजर राहीन असं मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे".
-
"ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली आहेत आणि भविष्यातही देत राहीन"
-
"पण प्रताप सरनाईकांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं, राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागीदारी असल्याची कागदपत्रं मिळाली अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्द करुन माझी आणि कुटुंबीयांची बदनामी करणाऱ्या कंगनाविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे"
-
"भविष्यात अजून बातम्या मिळतील, पण हे बदनामी करण्याचं कटकारस्थान आहे"
-
“ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु?”
-
"हक्कभंग प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी द्यावी अशी विनंती मी केली आहे"
ईडी, कंगना, पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आणि हक्कभंग….प्रताप सरनाईकांनी केलेली १० महत्त्वाची वक्तव्यं
विधीमंडळ परिसरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला
Web Title: Shivsena mla pratap sarnaik on ed kangana ranaut credit card sgy