• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. archaeologists uncover ancient street food shop in pompeii scsg

Photos: २००० वर्षांपूर्वीही लोकप्रिय होतं Street Food; उत्खननात सापडले दुकानांचे थक्क करणारे अवशेष

चित्रांची रंगसंगती आणि बारकावे अगदी थक्क करणारे आहेत

Updated: September 9, 2021 00:40 IST
Follow Us
  • इटलीमधील पोम्पी या शहरामध्ये उत्खननादरम्यान काही थक्क करणारे अवशेष सापडले आहेत. सन ७९ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये जमीनीमध्ये गाडल्या गेलेल्या शहरामधील रस्त्यांच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या दुकानांचे अवशेष येथे आढळून आले आहेत. गरम पदार्थ ठेवण्यासाठी मातीच्या भिंतीमध्ये मडक्यांप्रमाणे असणारी भांड्यांबरोबरच शितपेय विकण्यासाठीच्या मांडण्याही उत्खननादरम्यान आढळून आल्यात. (सर्व फोटो : रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)
    1/10

    इटलीमधील पोम्पी या शहरामध्ये उत्खननादरम्यान काही थक्क करणारे अवशेष सापडले आहेत. सन ७९ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये जमीनीमध्ये गाडल्या गेलेल्या शहरामधील रस्त्यांच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या दुकानांचे अवशेष येथे आढळून आले आहेत. गरम पदार्थ ठेवण्यासाठी मातीच्या भिंतीमध्ये मडक्यांप्रमाणे असणारी भांड्यांबरोबरच शितपेय विकण्यासाठीच्या मांडण्याही उत्खननादरम्यान आढळून आल्यात. (सर्व फोटो : रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)

  • 2/10

    रोमन काळामध्ये या शहरामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या बाजूला ही दुकाने लावली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लॅटीन भाषेमध्ये पेय मिळण्याच्या काऊंटरला टर्मोपोलीयम असं म्हणतात. आढळून आलेले अवशेष हे टर्मोपोलीयमचे असून हे अवशेष पुरातत्व संशोधकांना आर्किओलॉजिकल पार्कच्या रीजओ व्ही या ठिकाणी साडले आहेत. या भागामध्ये अद्याप पर्यटकांना प्रवेश देण्यात येत नसून येथे उत्खननाचे काम सुरु असल्याने येथे केवळ संशोधकांना जाण्यास परवानगी आहे. 

  • 3/10

    या संशोधनामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी या भागामध्ये कोणत्या पद्धतीचे पदार्थ तयार केले जायचे याचा शोध लावता येणार आहे. येथे सापडलेल्या काही भांड्यांमध्ये खाण्याचा अंदाज बांधता येतील असे काही पुरावे सापडल्याचा दावा केला जातोय. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या दुकानांमधील विक्रेते गोलाकार भांड्यांमध्ये हे पदार्थ ग्राहकांना द्यायचे. 

  • 4/10

    रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या दुकानांचा दर्शनी भाग हा वेगवेगळ्या चित्रांनी सजवण्यात आला आहे. या चित्रांमध्ये वापरण्यात आलेले प्राणी हे तेव्हाच्या पदार्थांमध्ये वापरले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

  • 5/10

    या दुकानांच्या दर्शनी भागी कोंबडा, बदक तसेच माशांची चित्र काढल्याचे दिसत आहे. या चित्रांना रंगवण्यासाठी वापरण्यात आलेले रंग हे आजही अगदी ताजे आणि फ्रेश वाटतात.

  • 6/10

    चित्रांमधील बारकावे अगदी योग्यपद्धतीने टीपण्यात आले आहेत. या बांधकामाची थोडी पडझड झाली असली तरी चित्रांमधील बारकावे आणि रंगसंगती अगदी काही वर्षांपूर्वीची वाटावी इतक्या ठसठशीतपणे दिसतेय. 

  • 7/10

    "हा अगदीच वेगळा शोध आहे. पहिल्यांदाच आम्हाला पूर्णपणे बांधकाम स्पष्टपणे दिसणारे टर्मोपोलीयम सापडले आहेत," असं पोम्पी आर्किओलॉजिकल पार्कचे संचालक असणाऱ्या मोसिमो ओसान यांनी म्हटलं आहे. 

  • 8/10

  • 9/10

    ज्वालामुखीच्या उद्रेक झाला तेव्हा या पोम्पी शहरामधील १३ हजार लोक ज्वालामुखीमधून बाहेर पडलेल्या राख आणि लाव्हारसामध्ये गाडले गेल्याचे सांगण्यात येते. हा स्फोट काही अणुबॉम्बच्या शक्ती इतका मोठा होता. 

  • 10/10

    पोम्पी हे शहर नेपल्सच्या नैऋत्येकडे २३ किलोमीटरवर आहे. या ठिकाणी १६५ एकरांवर आतापर्यंत उत्खनन करण्यात आलं आहे. १६ व्या शतकापासून येथे उत्खनन केलं जात आहे. १७५० मध्ये येथे पाहिल्यांदा उत्खनन करण्यात आलं. या ठिकाणाला युनिस्कोने जागतिक वारसा हक्क असा दर्जा दिला आहे. 

Web Title: Archaeologists uncover ancient street food shop in pompeii scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.