• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. saudi court jails women rights activist loujain al hathloul for six years scsg

इंटरनेटचा वापर, आंदोनलासाठी तिला कोर्टाने ठरवलं दहशतवादी; सुनावली सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जगाभरातून होतोय शिक्षेच्या निर्णयाला विरोध

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • सौदी अरेबियामधील महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मुख्य कार्यकर्त्या लोजैन अल-हथलौल यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
    1/20

    सौदी अरेबियामधील महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मुख्य कार्यकर्त्या लोजैन अल-हथलौल यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • 2/20

    देशातील दहशतवादविरोधी कायद्यानुसार लौजैन अल-हथलौल यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मात्र सौदी अरेबियामधील दहशतवादविरोधी कायद्यामध्ये ठोस तरतुदी नसल्याने कायद्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत या निर्णयाचा जगभरातून विरोध केला जात आहे.

  • 3/20

    विशेष म्हणजे लोजैन यांना तुरुंगवासाची शिक्षा सोमवारी सुनावण्यात आली असली तरी त्या मागील दोन वर्षांपासून कैदेत आहेत. तर त्यापूर्वीही त्यांना अनेकदा नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

  • 4/20

    लोजैन अल-हथलौल या अवघ्या ३१ वर्षांच्या असून मागील अनेक वर्षांपासून त्या महिलांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत.

  • 5/20

    राजकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोजैन अल-हथलौल यांच्यावर सतत निर्बंध आणणे आणि त्यांना कैदेत ठेवण्यामुळे सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झालाय.

  • 6/20

    मानवी हक्कासाठी लढणाऱ्या 'प्रिजनर्स ऑफ कॉन्शन्स'नुसार लोजैन अल-हथलौल यांना मार्च २०२१ मध्ये मुक्त केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांच्या सुटकेसाठी जगातील वेगवेगळ्या देशांमधील मानवाधिकार संस्थांकडून अनेकदा आंदोलनही करण्यात आली आहेत

  • 7/20

    लोजैन अल-हथलौल यांना मे २०१८ पासून कैदेत ठेवण्यात आलं आहे. याच आधारावर त्यांना सुनावण्यात आलेली ३४ महिन्यांची शिक्षा कमी होऊन त्यांना मार्चमध्ये सोडण्याची शक्यता होता. मात्र आता ती शक्यता मावळली आहे. 

  • 8/20

    लोजैन अल-हथलौल यांच्या कुटुंबाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये लोजैन अल-हथलौल यांच्यावर देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाच वर्षांसाठी लोजैन अल-हथलौल देश सोडून जाऊ शकत नाहीत. तसेच कैदेमधून सोडण्यात आल्यावर तीन वर्ष त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे.

  • 9/20

    अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्य जो बायडन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी लोजैन अल-हथलौल यांना सुनावण्यात आलेली शिक्षा ही अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

  • 10/20

    जेक सुलिवान यांनी ट्विटरवरुन "जसं की आम्ही यापूर्वीच स्पष्ट केलं आहे बायडन-हॅरिस प्रशासन हे मानावाधिकार कायद्यांच्या उल्लंघनाविरोधात कठोर निर्णय घेईल. हे अत्याचार कुठेही झाले तरी आमची भूमिका कठोर असणार आहे," असं म्हटलं आहे.

  • 11/20

    लोजैन अल-हथलौल या सौदी अरेबियामधील त्या मोजक्या महिलांपैकी आहेत ज्यांनी महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देण्यात यावी आणि पुरुष प्रधान कायदे रद्द करावेत अशी मागणी केली होती.

  • 12/20

    लोजैन अल-हथलौल या सौदी अऱेबियामधील पहिल्या महिला चालक आहेत.

  • 13/20

    हे दोन्ही कायदे महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे असल्याची भूमिका घेणाऱ्या  सौदीमधील पुरोगामी विचारसरणीच्या काही निवडक महिलांपैकी लोजैन अल-हथलौल एक आहेत.

  • 14/20

    सौदी अरेबियातील सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दहशतवादविरोधी न्यायालयामध्ये लोजैन अल-हथलौल या वेगवेगळ्या आरोपांमध्ये दोषी आढळून आल्या आहेत.

  • 15/20

    न्यायालयाने लोजैन अल-हथलौल यांना यापूर्वी सुनावण्यात आलेली सध्याच्या पाच वर्षाच्या शिक्षेपैकी दोन वर्ष १० महिन्यांची शिक्षा रद्द केली आहे. मात्र आधीच अडीच वर्षांपासून अधिक काळ तुरुंगात असल्याने लवकरच त्यांची सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

  • 16/20

    सौदी अरेबियामधील कायद्यांनुसार बदलासाठी आंदोलनाची हाक देणं, विदेशी विचारसरणी परसवण्याचा प्रयत्न करणं, लोक व्यवस्थेला नुकसान पोहचवण्यासाठी इंटरनेटचा वापर करणं यासारख्या आरोपांचा समावेश लोजैन अल-हथलौल यांच्याविरोधातील खटल्यामध्ये आहे. याप्रकरणात त्या दोषी आढळल्या आहेत.

  • 17/20

    दहशतवादविरोधी कायद्यानुसार ज्या व्यक्तींना तसेच संस्थांना दोषी ठरवण्यात आलं आहे त्यांना पाठिंबा दिल्या प्रकरणीही लोजैन अल-हथलौल यांना दोषी ठरवलं आहे. 

  • 18/20

    लोजैन अल-हथलौल या निकालाला एका महिन्याच्या कालावधीमध्ये आव्हान देऊ शकतात. त्यांच्या कुटुंबियांनी या निकालाविरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचेही वृत्त आहे.

  • 19/20

    लोजैन अल-हथलौल यांना २०१८ साली परदेशी राजकीय व्यक्ती, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते तसेच संघटनांच्या मदतीने चर्चा करुन सौदीमधील महिलांच्या अधिकारांसाठी देशातील सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करणं तसेच देशातील राजकीय परिस्थितीला हानी पोहचवण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं. 

  • 20/20

    माझी बहिणी ही दहशतवादी नसून ती महिलांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ता आहे. अशाप्रकारे तिला दहशतवादी ठरवणं म्हणजे ढोंगीपणा आहे असं मत लोजैन अल-हथलौल यांच्या बहिणी लिना हिने व्यक्त केलं आहे. (फोटो: रॉयटर्स एपी, एफएफपी, ट्विटर आणि फेसबुकवरुन साभार)

Web Title: Saudi court jails women rights activist loujain al hathloul for six years scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.