Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. an attack hit aden airport in yemen shortly after the arrival of the country prime minister scsg

Photos: नवीन सरकारच्या स्वागतासाठी विमातळावर झाली गर्दी अन् तितक्यात झाला भीषण स्फोट

स्फोट झाला तेव्हा देशाच्या पंतप्रधानांसहीत मंत्रमंडळातील अनेक सदस्य विमानात होते

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • येमेनमधील तणावपूर्ण वातावरण निवळून शांतता प्रस्थापित होऊन नवीन सरकार स्थापन होऊन सत्तेत येण्याआधीच पुन्हा एकदा येमेनमध्ये मोठा घातपात घडला आहे.
    1/22

    येमेनमधील तणावपूर्ण वातावरण निवळून शांतता प्रस्थापित होऊन नवीन सरकार स्थापन होऊन सत्तेत येण्याआधीच पुन्हा एकदा येमेनमध्ये मोठा घातपात घडला आहे.

  • 2/22

    येमेनच्या दक्षिणेला असणाऱ्या अदन विमानतळावर बुधवारी रात्री भीषण स्फोट झाला. येमेनच्या पंतप्रधानांबरोबरच मंत्रीमंडळाच्या सदस्यांना घेऊन येणारं विमान उतरल्यानंतर काही वेळातच मोठा स्फोट झाला. 

  • 3/22

    अदन विमानतळावरील या स्फोटामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

  • 4/22

    अदन विमानतळावरवरील या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नसली तरी येमेन सरकार आणि येमेनमधील नवीन सरकारला पाठिंबा देणाऱ्या सौदी अरेबियाने हा स्फोट इराणचे समर्थन असणाऱ्या हूती विरोधकांनी घडवून आणल्याचा आरोप केलाय. मात्र हूती विरोधकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

  • 5/22

    घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये विमानातील काही सरकारी प्रतिनिधी मंडळातील व्यक्ती विमानाबाहेर येतानाच हा स्फोट झाल्याचे दिसत आहे. एका मोठ्या स्फोटामागोमाग काही लहान स्फोटोही झाल्याचे दिसत आहे.

  • 6/22

    हल्लेखोरांनी विमानतळावरील मुख्य रस्ताही उडवून लावला. तसेच या हल्ल्याच्या वेळी गोळीबार झाल्याचा आवाजही ऐकू येत होता. 

  • 7/22

    सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही सरकारी अधिकारी जखमी झालेला नाही. स्फोटाचा आवाज ऐकून विमानाबाहेर आलेले काही अधिकारी पुन्हा आतमध्ये गेल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.

  • 8/22

    समोर आलेल्या माहितीनुसार येमेनच्या दक्षिणेला असणाऱ्या अदन विमानतळावर सौदी अरेबियामधून सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन येणारं विमान उतरलं. येमेनमधील सत्तासंघर्षानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील पंतप्रधानांपासून मंत्रीमंडळातील इतर सदस्यही या विमानामध्ये होते. या विमानातील नवनिर्वाचित नेत्यांचे स्वागत करण्यासाठी समर्थकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. 

  • 9/22

    शेकडोच्या संख्येने नवीन सरकारचे समर्थक विमानाजवळ गोळा झालेले असतानाच हा स्फोट झाला.

  • 10/22

    समर्थकांचे आभार मानत अधिकारी विमानातून खाली उतरत असतानाच मोठा आवाज झाला आणि सर्वांची एकच पळापळ सुरु झाली.

  • 11/22

    धुराचे सम्राज्य विमानतळाच्या आजूबाजूला पसरलं.

  • 12/22

    येमेन सरकारच्या मालकीच्या या विमानामध्ये प्रवास करणारे दूरसंचार मंत्री नजीब अल अवग यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचा आवाज ऐकून हा स्फोट ड्रोनच्या माध्यमातून घडवण्यात आल्यासारखे वाटले.

  • 13/22

    पंतप्रधानांसहीत अन्य बड्या नेते आणि अधिकाऱ्यांनी विमानतळावरुन शहरातील मशिक पॅसेल येथे हलवण्यात आलं.

  • 14/22

    पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद यांनी नंतर रुग्णालयात जाऊन हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची भेट घेतली.

  • 15/22

    स्फोट झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ सुरु झाल्याचे काही व्हायरल व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 16/22

    अदन येथील आरोग्य विभागाचे उप प्रमुख असणारे मोहम्मद अल रोउबिद यांनी असोसिएट प्रेसला दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर तेथे किमान १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून ६० हून अधिकजण जखमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र नंतर हा मृत्यांचा आकडा वाढून २६ पर्यंत पोहचला आहे.

  • 17/22

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विमानतळावर बांधकामाला झालेली हानी झाल्याचे दिसत आहे.

  • 18/22

    विमानतळाच्या इमारतीच्या अनेक काचा फुटलेल्या स्वरुपात दिसत असून जमीनीवर तुटलेल्या काचांचे खच दिसत आहे.

  • 19/22

    काही व्हिडीओंमध्ये स्फोटात मरण पावलेल्यांचे मृतदेह दिसून येत आहे. 

  • 20/22

    जखमींना जवळच्या रुग्णालामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

  • 21/22

    या घातपातानंतर अदन शहराबरोबरच देशातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीय.

  • 22/22

    काही व्हिडीओंमध्ये स्फोटात मरण पावलेल्यांचे मृतदेह दिसून येत आहे. (सर्व फोटो रॉयटर्स, एएफपी आणि ट्विटवरुन साभार)

Web Title: An attack hit aden airport in yemen shortly after the arrival of the country prime minister scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.