Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. what all is changing in new year 2021 sgy

नवीन वर्षात ‘या’ गोष्टी बदलल्या आहेत; जाणून घ्या

नवीन वर्ष अनेक नवे बदल घेऊन आलं आहे

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • नवीन वर्ष अनेक नवे बदल घेऊन आलं आहे. नवीन वर्षात धनादेश देय पद्धत, वाहन खरेदी अशा अनेक गोष्टींमध्ये बदल झालेले पहायला मिळणार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात... (सर्व फोटो - संग्रहित)
    1/8

    नवीन वर्ष अनेक नवे बदल घेऊन आलं आहे. नवीन वर्षात धनादेश देय पद्धत, वाहन खरेदी अशा अनेक गोष्टींमध्ये बदल झालेले पहायला मिळणार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात… (सर्व फोटो – संग्रहित)

  • 2/8

    नवीन धनादेश देय पद्धती : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत. ५०,००० रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • 3/8

    संपर्करहित एटीएम कार्ड मर्यादा : ‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता २०२० मध्ये अंमलात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे. एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली २,००० रुपयांची मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

  • 4/8

    व्हॉट्सअ‍ॅपचे मर्यादित भ्रमणध्वनी व्यासपीठ :अ‍ॅण्ड्रॉइडच्या ओएस ४.०.३ तसेच आय फोनच्या आयओएस ९ मंच सुसज्ज असलेल्या मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा घेता येणार नाही. तसेच निवडक संख्या असलेल्या केएआय २.५.१ तंत्रज्ञानावरील फोनवरही ही संदेश वहन यंत्रणा काम करू शकणार नाही.

  • 5/8

    लॅण्डलाईन-मोबाइल कॉलसाठी आता शून्य : स्थिर पद्धतीच्या (लँडलाईन) दूरसंपर्क माध्यमाद्वारे भ्रमणध्वनीवर केले जाणाऱ्या कॉलसाठी आता (एसटीडीप्रमाणे) क्रमांकाआधी शून्य लावावा लागेल. यामुळे दूरसंचार क्रमांकाच्या भाऊगर्दीत सुसूत्रता येईल, असा दूरसंचार विभागाचा दावा आहे.

  • 6/8

    यूपीआय व्यवहार देय : यूपीआयद्वारे होणारे निधी व्यवहारांसाठी आता वाढीव किंमत मोजावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे, गूगल पे, फोन पेसारख्या देय मंचावरून होणाऱ्या निधी हस्तांतरण रकमेबरोबर काही प्रमाणात शुल्क द्यावे लागेल.

  • 7/8

    वाहन खरेदी महागडी : प्रवासी तसेच एसयूव्ही वाहनांच्या किंमत १ जानेवारी २०२१ पासून वाढत आहेत. विदेशी विनिमय चलनातील फरक तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या किंमती अप्रत्यक्ष करामुळे वाढल्याने वाहनांच्या एकूण किंमती ३ ते ५ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत. अनेक कंपन्यांची त्यांही ही दरवाढीची मात्रा १ जानेवारीपासून लागू करत असल्याचे जाहीर केले आहे.

  • 8/8

    तर व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र वाढ झालीये.

Web Title: What all is changing in new year 2021 sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.