Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. indo canadian mp kamal khera quits key post after violating covid travel curbs scsg

कॅनडा : करोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर भारतीय वंशाच्या महिला खासदाराने राजीनामा देत सोडलं पद

त्या कॅनडीयन पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या निटवर्तीय नेत्यांपैकी एक आहेत

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • कॅनडामधील भारतीय वंशाच्या महिला खासदाराने कॅनडियन संसदेच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. 
    1/16

    कॅनडामधील भारतीय वंशाच्या महिला खासदाराने कॅनडियन संसदेच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. 

  • 2/16

    कमल खेरा असं या महिला खासदाराचं नाव असून कॅनडामध्ये करोनाची दुसरी लाट आलेली असतानाच नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

  • 3/16

    कॅनडामध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याच कालावधीमध्ये कमल या त्यांच्या काकांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमेरिकेमध्ये जाऊन आल्या. 

  • 4/16

    मात्र करोना कालावधीमध्ये देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कमल यांनी अशाप्रकारे खासगी कारणासाठी केलेला अमेरिका दौऱ्यावरुन नवीन वाद निर्माण झाला.

  • 5/16

    एकीकडे सर्वसामान्यांसाठी निर्बंध कठोर केले जात असतानाच दुसरीकडे नेते मंडळी अशाप्रकारे परदेशी दौरे करत असल्याची टीका कमल यांच्या या अमेरिकेच्या दौऱ्यासंदर्भात सोशल मिडियावर रंगू लागली. सर्वसामान्यांनी गरज असतानाच बाहेर पडा असं एकीकडे नेतेमंडळी सांगत असतानाच दुसरीकडे ते स्वत: मात्र असे दौरे करत असल्यावरुन अनेकांनी कमल यांनी सुनावले.

  • 6/16

    इतकच नाही तर कमल यांना करोना काळात हा दौरा टाळता आला ्असता असं मतही अनेकांनी नोंदवलं. याच टीकेमुळे कमल यांनी संसदेच्या सचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

  • 7/16

    लोकांनी अनावश्यक प्रवास करुन नये. करोनाच्या कालावमधीमध्ये अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावं असं आवाहन कमल या स्वत: नागरिकांना करत होता. मात्र त्या स्वत: अमेरिकेमधून काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमेरिकेमध्ये जाऊन आल्यानंतर नागरिकांनी त्यांच्या या दौऱ्याविरोधात आक्षेप नोंदवला. 

  • 8/16

    याच टीकेला उत्तर देताना आपण केलेला अमेरिकेचा दौरा हा एका विशिष्ट हेतूने करण्यात आला होता. अशा दु:खाच्या प्रसंगी कुटुंबासोबत राहता यावे या हेतूने आपण दौरा केला होता, असं कमल यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र याच पत्रकामध्ये त्यांनी राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली. 

  • 9/16

    कलम यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला असून त्यांनी परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर त्या कॅनडामध्ये स्थायिक झाल्या. सध्या त्या ब्रॅम्टन पश्चिमच्या खासदार असून तेथील कॅनडीयन भारतीय नागरिकांमधील लोकप्रिय नेत्या आहेत.

  • 10/16

    अमेरिकेबरोबरच कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कलम यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात घेतलेल्या पुढाकारावरुन अनेकांनी त्यांचं कौतुक केलं होतं.

  • 11/16

    करोनाचा संसर्ग झालेल्या कमल या कॅनडामधील पहिल्या खासदार होत्या. त्यांनी यशस्वीपणे करोनावर मात केली.

  • 12/16

    कमल यांनी राजीनामा देण्यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये या पुढेही आपण लसीकरण आणि करोनासंदर्भातील लढाईमध्ये शक्य ती सर्व मदत करणार आहोत असं म्हटलं आहे.

  • 13/16

    मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर काही आठवड्यांनी माझ्या काकांचं निधन झालं, अशी माहिती कमला यांनी जारी केलेल्या पत्रात दिली आहे. काकांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कमल सिएटलला गेल्या होत्या. 

  • 14/16

    माझ्या काकांच्या श्रद्धांजली सभेसाठी आम्ही कोणालाही बोलावलं नव्हतं. त्यामुळे तेथे दहा लोकंही उपस्थित नव्हती. मी नंतर त्यांच्या शोकसभेसाठीही गेले नाही, असं कमल यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. कॅनडामधील संसदेचे सत्र संपल्यानंतर २३ डिसेंबर रोजी कमल या अमेरिकेला गेल्या होत्या आणि ३१ डिसेंबर रोजी त्या पुन्हा कॅनडात आल्या होत्या. याच आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी आता कमल यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

  • 15/16

    कमल या भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

  • 16/16

    जस्टिन त्रुडो यांनी केलेल्या भारत दौऱ्यादरम्यान कमल त्रुडो कुटुंबासोबतच होत्या. (सर्व फोटो : Instagram/kamalkheralib वरुन साभार)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Indo canadian mp kamal khera quits key post after violating covid travel curbs scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.