-
बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचले. (सर्व फोटो – धनंजय मुंडे ट्विटर)
-
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे बीड व शिरुर कासार तालुक्यांच्या दौऱ्यावर होते.
-
यावेळी समर्थकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
-
जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
-
जिथे जाईल तिथे लोकांचे प्रेम, गावोगाव स्वागत-सत्कार अनुभवून मी भारावून गेलो. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटाशी तोंड द्यायची प्रेरणा देतात अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
-
कातड्याचे जोडे घातले तरी परतफेड होणार नाही अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी समर्थकांचे आभार मानले.
-
"आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे. जीवनात कधीच कोणाचं मन दुखवून नाही तर जिंकून स्थान निर्माण केलं आहे. आपलंही मन जिंकलंय म्हणून एवढं मोठं स्वागत केलं," असंही ते म्हणाले.
-
"अशा कठीण प्रसंगी आपण सर्व माझ्या पाठिशी उभे राहिलात त्याबद्दल शब्दांत आभार मानू शकत नाही. पण एक सांगतो आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरच्या कातड्याचे जोडे काढून जरी घातले तरी होऊ शकत नाही याची मला जाणीव आहे," असं सांगताना त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.
-
शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह येथील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्राम सचिवालयाचे धनंजय मुंडेंच्या लोकार्पण करण्यात आले.
-
ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या ठिकाणी बाबांच्या गढीच्या जागी भव्य मंदिर उभे करण्यात येत आहे. या कार्यास निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला.
-
(All Photos: Twitter)
बलात्काराच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जंगी स्वागत; जेसीबीवरुन फुलांची उधळण
NCP, Dhananjay Munde
Web Title: Ncp dhananjay munde grand welcome in beed sgy