• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. income tax raid going on at residence of balraj kundu independent mla haryana scsg

सरकारचा पाठिंबा काढून शेतकऱ्यांचं समर्थन करणाऱ्या आमदाराच्या घरावर आयकर विभागाचा छापा

त्यांच्या घराबरोबर सासरवाडीमध्येही छापा टाकण्यात आला

Updated: September 9, 2021 00:34 IST
Follow Us
  • आयकर विभागाने गुरुवारी हरयाणामधील अपक्ष आमदार बलराज कुंडू यांच्या घरासहीत ३० वेगवेगळ्या संपत्तींवर छापा टाकला आहे.
    1/10

    आयकर विभागाने गुरुवारी हरयाणामधील अपक्ष आमदार बलराज कुंडू यांच्या घरासहीत ३० वेगवेगळ्या संपत्तींवर छापा टाकला आहे.

  • 2/10

    आयकर विभागाने आज सकाळी रोहतक येथील सेक्टर १४ मधील बलराज यांच्या राहत्या घराबरोबरच गुरुग्राममधील घरावरही छापा मारलाय.

  • 3/10

    त्याबरोबर बलराज यांची सासरवाडी असणाऱ्या हिसारमधील हांसी आणि त्यांच्या भावांच्या रोहतक येथील घरांवरही आयकर विभागाने छापा मारला आहे. 

  • 4/10

    बलराज यांच्या जवळच्या नातेवाईक आणि संपत्तीवर एकूण ३० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

  • 5/10

    विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बलराज यांनी राज्यात सत्तेत असणाऱ्या खट्टर सरकारला दिलेले पाठिंबा काढून घेतल्यानंतर ही छापेमारी करण्यात आल्याने अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. 

  • 6/10

    रोहतक जिल्हामधील बड्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या बलराज यांनी २०१९ च्या हरयाणा विभानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली होती.

  • 7/10

    बलराज यांना भाजपाने तिकीट नाकारलं. त्यानंतर त्यांनी भाजपाचे उमेदवार शमशेह सिंह खरखरा यांच्या विरोधात उभं राहून त्यांना निवडणुकीत पराभूत केलं. काँग्रेसचे दिग्गज नेते आनंद सिंह दांगी यांचाही बलराज यांच्या लोकप्रियतेसमोर निभाव लागला नाही.

  • 8/10

    जिंकल्यानंतर बलराज यांनी मनोहर लाल खट्टर सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र मागील वर्षी त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई न केल्याच्या विरोधात खट्टर सरकारला दिलेला पाठिंबा काढला. 

  • 9/10

    बलराज मागील अनेक दिवसांपासून उघडपणे शेतकरी आंदोलनाला समर्थन करत आहेत. बलराज यांनी शेतकरी कायद्यांना विरोध करत असून ते अनेक ठिकाणी शेतकरी महापंचायतींच्या सभांनाही उपस्थिती लावत आहेत. 

  • 10/10

    मागील वर्षी बलराज यांनी त्यांचे माजी सहकारी मनीष ग्रोव्हर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र खट्टर सरकारने यावर काहीच कारवाई न केल्याने बलराज यांनी पाठिंबा मागे घेतला. मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांचे समर्थन करतात असा आरोप बलराज यांनी केला होता. त्यामुळेच मी पाठिंबा काढत आहे असं बलराज म्हणाले होते.  आज बलराज यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडल्याने यामागे काही राजकीय कारण आहे का यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्यात.

Web Title: Income tax raid going on at residence of balraj kundu independent mla haryana scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.