• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. in pics nitin gadkari ministry construction of 25 km road completed in 18 hours sets limca book of records scsg

१८ तासांमध्ये २५ किमी लांबीचा डांबरी रस्ता; गडकरींचं खातं थेट लिम्का बुकात

गडकरींनीच यासंदर्भातील माहिती दिलीय

Updated: September 9, 2021 00:34 IST
Follow Us
  • केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोकठोक मतप्रदर्शनाबरोबरच कामासाठीही ओळखले जातात.
    1/6

    केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोकठोक मतप्रदर्शनाबरोबरच कामासाठीही ओळखले जातात.

  • 2/6

    आपल्या खात्याअंतर्गत सतत काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा गडकरींचा प्रयत्न असतो. अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नाला नुकतचं यश आलं असून त्याची दखल थेट 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'कडून घेतली जाणार आहे.

  • 3/6

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच सोलापूर ते विजापूर या मार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाअंतर्गत २५.५४ किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचे डांबरीकरण केलं. विशेष म्हणजे हे डांबरीकरण अवघ्या १८ तासांमध्ये करण्यात आलं आहे. याची दखल थेट 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली असून या कामाची लिम्का बुककडून नोंद घेतली जाणार आहे. 

  • 4/6

    १८ तासांमध्ये २५ किमीहून अधिक लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामात ५०० कर्मचारी सहभागी झाले होते. ठेकेदाराच्या कंपनीने हे काम करुन दाखवल्याबद्दल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या या परियोजनेचे निर्देशक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधिक आणि या योजनेतील सर्व अधिकाऱ्यांचेही गडकरींने अभिनंदन केलं आहे. 

  • 5/6

    सध्या ११० किमी लांबीच्या सोलापूर-विजापूर महामार्गाचं काम सुरु आहे. हे काम ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. 

  • 6/6

    या आगळ्यावेगळ्या पराक्रमाची माहिती गडकरींनीच आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन दिलीय. हे ट्विट दोन हजार ८०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे तर १८ हजारांहून अधिक जणांनी त्याला लाईक केलंय. (सर्व फोटो: Twitter/nitin_gadkari वरुन साभार)

Web Title: In pics nitin gadkari ministry construction of 25 km road completed in 18 hours sets limca book of records scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.