• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. vaccination drive for senior citizens in progress at jumbo covid mulund hospital in mumbai sdn

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण

Updated: September 9, 2021 00:34 IST
Follow Us
  • देशात एक मार्चपासून कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. (सर्व फोटो - दीपक जोशी)
    1/11

    देशात एक मार्चपासून कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. (सर्व फोटो – दीपक जोशी)

  • 2/11

    या टप्प्यात ४५ ते ६० वर्षांपर्यंत सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.

  • 3/11

    करोनाबाधित होण्याच्या भीतीने जवळपास गेले वर्षभर घरात कोंडून राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी सकाळपासूनच करोनाची लस घेण्यासाठी शहरातील केंद्रांवर गर्दी केली होती.

  • 4/11

    परंतु ‘कोविन अ‍ॅप’मधील त्रुटींमुळे ज्येष्ठ नागरिकांसह अत्यावश्यक आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगांमध्ये ताटकळत बसावे लागल्याने सर्व केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता.

  • 5/11

    मुंबईत मुलुंड, दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीके सी) करोना केंद्र, गोरेगावचे नेस्को करोना केंद्र आणि सेव्हन हिल्स रुग्णालय येथे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.

  • 6/11

    नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येत असून यासाठी selfregistration.cowin.gov.in किंवा http://www.covin.gov.in येथे करता येते.

  • 7/11

    एका मोबाइल क्रमांकावरून चार जणांच्या नावाची नोंदणी करणे शक्य.

  • 8/11

    ऑनलाइन नोंदणीसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, एनपीआर स्मार्ट कार्ड, पेन्शन कागदपत्रे (छायाचित्रासह) ग्राह्य़ धरली जातील. ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना सह आजाराचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

  • 9/11

    माहिती दिलेले ओळखपत्र लसीकरणाच्या वेळेस जवळ बाळगणे आवश्यक. सहव्याधी असलेल्या रुग्णांनी उपचार घेत असलेल्या डॉक्टरांकडून नमूद केलेल्या पद्धतीत वैद्यकीय प्रमाणपत्र लसीकरणाच्या वेळेस सादर करणे आवश्यक.

  • 10/11

    निवडलेला दिवस किंवा वेळ बदलण्याचा पर्याय उपलब्ध. दुसरी मात्रा घेण्यासाठी केंद्र बदलण्याचा पर्यायही उपलब्ध.

  • 11/11

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाने करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी सुरुवात झाली. मोदी यांनी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात सकाळी ७ वाजता देशी ‘कोव्हॅक्सिन’ची पहिली मात्रा घेतली.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Vaccination drive for senior citizens in progress at jumbo covid mulund hospital in mumbai sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.