Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pmpml bus filled with passengers on jm road amidst rising cases of corona virus in pune scsg

Photos: पुण्यात PMPML च्या बसेसमध्ये करोना चेंगरुन मरेल एवढी गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पुण्यातील पीएमपीएमएल बसमधील गर्दी पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • राज्यातील अनेक भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मास्क वापरणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब या तीन गोष्टी आवश्यक असून या गोष्टींच्या मदतीनेच करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल आणि करोनापासून स्वत:चा बचाव करता येईल असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनावश्यक गर्दी टाळण्यासंदर्भातही भाष्य केलं आहे. (प्रतिनिधिक फोटो)
    1/5

    राज्यातील अनेक भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मास्क वापरणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब या तीन गोष्टी आवश्यक असून या गोष्टींच्या मदतीनेच करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल आणि करोनापासून स्वत:चा बचाव करता येईल असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनावश्यक गर्दी टाळण्यासंदर्भातही भाष्य केलं आहे. (प्रतिनिधिक फोटो)

  • 2/5

    मात्र असं असतानाही मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पुण्यात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. खास करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीय. पीएमपीएमएलच्या बसेसमधून पुणेकर अगदी दाटीवाटीने प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/5

    जंगली महाराज मार्गावरील हा फोटो पुण्यामध्ये सोशल डिस्टन्सींग किती गांभीर्याने घेतलं जात आहे हेच दाखवतोय. पीएमपीएमएलच्या बसमध्ये अनेक प्रवासी अगदी एकमेकांना चिटकून दाटीवाटीने उभं राहून प्रवास करत आहेत. अनेक बस तर अगदी प्रवाशांना दारात उभं राहण्याची वेळ येईपर्यंत भरल्या जात आहेत. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/5

    बसमधील आसनक्षमता पूर्ण भरल्यानंतर स्टॅण्डींगने प्रवासी घेण्यासंदर्भातील कोणतेच नियम पाळले जात नाहीय. बसच्या मधल्या पॅसेजपासून ते दोन्ही दरवाजांपर्यंत सगळीकडे प्रवासी जवळजवळ उभं राहून प्रवास करताना दिसतात. अनेक ठिकाणी खासगी गाड्यांची आणि दुचाकीस्वारांनी मास्क घातलं आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी सार्वजनिक बस वाहतूकीकडे पोलिसांचंही दूर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. (फोटो : पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/5

    पुण्यामध्ये सध्या पीएमपीएमएलच्या बससेची सेवा वगळता इतर सार्वजनिक वाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध नसल्याने कामाला जाणाऱ्या पुणेकरांकडे या बसेसशिवाय इतर कोणताही पर्याय नाहीय. त्यामुळेच या बसमध्ये अशापद्धतीने नियमांचे उल्लंघन करुन, करोना संसर्गाचा धोका पत्करुन प्रवास करावा लागतोय. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

Web Title: Pmpml bus filled with passengers on jm road amidst rising cases of corona virus in pune scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.