-
वांद्रे-कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रात दररोज शेकडो नागरिक लसीकरणासाठी येतात.
-
अनेकांना केंद्राबाहेर प्रतीक्षा करावी लागते.
-
पावसाळ्यात प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी या भागावर छत टाकण्याचे काम करण्यात येत आहे.
-
केंद्र सरकारने एकीकडे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईत अद्याप पहिल्या दोन टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले नाही. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण वेगाने झालेले नाही.
-
लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिके ने मुंबईतील केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
-
(सर्व फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्यांसाठी खास सोय
Web Title: Covid 19 waiting area of bkc jumbo vaccination centre restructuring work monsoon mumbai sdn