-
नवी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता चिघळला असून आज स्थानिकांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत सिडकोच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर सिडको कार्यालय परिसरामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. (सर्व फोटो : नरेंद्र वास्कर)
-
सकाळपासूनच नवी मुंबईमधील सिडको भवन परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप आलंय.
-
बुधवारपासूनच आजच्या मोर्चासाठीची तयारी पोलीस खात्याने सुरु केली होती.
-
महिला पोलिसांना कालच बेलापूर पोलीस ग्राऊण्डवर यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या.
-
बुधवारी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांची ड्युटी कुठे लावण्यात आलीय यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
-
पुरुष कर्मचाऱ्यांबरोबरच मोठ्या संख्येने महिला कर्मचाऱ्यांनाही तैनात करण्यात आलंय.
-
कालच नवी मुंबई पोलिसांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना या सुरक्षेसंदर्भात ब्रफिंग दिलं.
-
महिला पोलीसांनाही मोठ्याप्रमाणात तैनात करण्यात आलंय.
-
आज पहाटेपासूनच पोलीस सिडको भवानबाहेर तैनात आहेत.
-
लाकडाच्या ढाली, हेल्मेट, काठ्या अशा सर्व साहित्यासहीत पोलीस या ठिकणी तैनात आहेत.
Photos : दि. बा. पाटलांच्या नावासाठी नवी मुंबईत आंदोलन; CIDCO परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता चिघळला असून आज या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत सिडकोच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Web Title: Navi mumbai airport name d b patil protest at cidco office police security scsg